नितेश राणेंकडून वक्फ बोर्डाचा उल्लेख करत मोठी मागणी ; म्हणाले, ‘हिंदूंवर आलेलं संकट थांबवण्यासाठी…’

Nitesh Rane On Sanatan Board । राज्याचे मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे पुन्हा एकदा त्यांच्या विधानांमुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी सनातन बोर्डाची मागणी केली आहे. रत्नागिरी याठिकाणी जाहीर सभेला संबोधित करताना राणे यांनी, “आज हे जाणून घेण्याची गरज आहे की वक्फ बोर्ड नावाचे हे हिरवे संकट हिंदूंवर आले आहे. हे थांबवण्याची गरज आता निर्माण झाली आहे.”असे त्यांनी म्हटले आहे.
मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी, “वक्फ बोर्ड नावाचे संकट आपल्यासमोर उभे आहे. म्हणून हे थांबवण्यासाठी, मी याठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व धार्मिक नेत्यांना हिंदू धर्माच्या रक्षणासाठी जगद्गुरूंच्या नेतृत्वाखाली सनातन बोर्ड स्थापन करण्याची विनंती करेन.” असेही त्यांनी म्हटले आहे.
प्रत्येक इंच जमीन परत घ्यावी लागेल Nitesh Rane On Sanatan Board ।
पुढे बोलताना त्यांनी, “हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी कोणती पावले उचलली पाहिजेत?” कोणते नियम बनवावेत…स्वामी नरेंद्र तुम्ही भूमिका घ्यावी. हिंदूंच्या निवासस्थानांभोवती व्यापलेली प्रत्येक इंच जमीन सनातन बोर्डामार्फत परत घेतली पाहिजे.” अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
नितेश राणे म्हणाले, “ज्याप्रमाणे मोदीजी केंद्रात हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी काम करत आहेत, त्याचप्रमाणे सनातन बोर्डाच्या माध्यमातून देशात हिंदूंच्या भूमीचे रक्षण केले पाहिजे, ही माझी मागणी आहे.”
लाऊडस्पीकरबाबत नितेश राणे यांचे विधान Nitesh Rane On Sanatan Board ।
नितेश राणे यांनी नुकतेच मशिदींमध्ये वाजवल्या जाणाऱ्या लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावर म्हटले होते की, “जर तुम्हाला लाऊडस्पीकर वाजवायचे असतील तर पाकिस्तानात जा, इथे लाऊडस्पीकर चालणार नाहीत.” पुढे त्यांनी, “भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मशिदींवर लावलेल्या लाऊडस्पीकरमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाबाबत तक्रार दाखल केली होती, त्यानंतर पोलिस मुंबईत अनेक ठिकाणी कारवाई करत आहेत. तसेच “मशिदींवरील लाऊडस्पीकरचा प्रश्न येतो तेव्हा त्यांना अडचण का येते.” असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला होता.





