Nishikant Dubey Attack congress । झारखंडमधील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर मोठा आरोप केला आहे. त्यांनी आज ,”काँग्रेस एनडीएच्या खासदारांची हत्या करू शकते असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यासोबतच निशिकांत दुबे यांनी, “राहुल गांधी हे शहरी नक्षलवाद्यांचे सर्वात मोठे नेते आहेत.”असाही आरोप केला. एका वृत्तवाहिनीशी बोलताना निशाणीकांत दुबे यांनी,”राहुल गांधी ज्या प्रकारे महिला खासदार फॅनॉन्ग कोन्याक यांच्या जवळ गेले त्याचे वर्णन ती करू शकत नाही. बोलताना ती स्वतःच रडू लागली. ही बुडून मरण्यासारखी बाब नाही का? 70-72 वर्षांचे खासदार सारंगी जमिनीवर पडले ते जखमी झाले आणि वरून राहुल गांधी म्हणतात त्यांनी मला ढकलले हे सर्व न पटण्यासारखे आहे त्यांनी त्यांना तात्काळ निलंबित करा अशी मागणी निशिकांत दुबे यांनी केली आहे. ‘या लोकांना देशाचे तुकडे करायचे आहेत’ Nishikant Dubey Attack congress । निशिकांत दुबे इथेच थांबले नाहीत. ते पुढे म्हणाले की, 2001 मध्ये संसदेवर पाकिस्तानींनी हल्ला केला होता, पण काल लोकशाहीच्या मंदिरावर त्याहूनही मोठा हल्ला झाला आणि हा हल्ला राहुल गांधींनी केला. निशिकांत दुबे पुढे म्हणाले, “काश्मीरच्या नावावर, सीएएच्या नावावर, अग्निवीरच्या नावावर, या लोकांना देशाचे तुकडे करायचे आहेत. या सगळ्याचे म्होरके राहुल गांधी आहेत.” ‘यावरून राहुल गांधींचा अहंकार दिसून येतो’ Nishikant Dubey Attack congress । भाजप खासदारांना धक्काबुक्की करण्याच्या काँग्रेसच्या आरोपांवर निशिकांत दुबे म्हणाले की, ते खोटे बोलत आहेत. 70 वर्षांचा माणूस आणि 56 किलोचा माणूस 50 वर्षाच्या माणसाला धक्का देऊ शकतो का? आमचे मित्र सारंगीची अवस्था विचारण्याऐवजी त्यांनी मला ढकलले, असे वारंवार सांगितले. हा काँग्रेस आणि राहुल गांधींचा अहंकार आहे. राहुल गांधी आजही स्वत:ला राजघराण्यातील सदस्य मानतात” असेही त्यांनी यावेळी म्हटले. राहुल यांच्याविरोधात लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार निशिकंद दुबे यांनी शुक्रवारीच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर धमकी दिल्याचा आरोप केला आहे.