निरुपमांचा चव्हाणांना घरचा आहेर; ठाकरे सरकारवरही ताशेरे

मुंबई: राज्यात कोरोना संकटात राजकारण देखील चांगलंच तापलं आहे. सत्तेत असलेले काँग्रेने महाविकास आघाडीला घरचा आहेर दिला आहे. माजी खासदार संजय निरुपम यांनी ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारवर टीका केली.  निरुपम यांनी ट्विट मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना देखील लक्ष केले आहे.


निरुपम म्हणाले, “मुंबईत ‘कोरोना’चा कहर पाहायला मळत आहे. गेल्या 24 तासात 47 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या दर तासाला दोन मुंबईकर मृत्युमुखी पडत आहेत. आज (16 मे) 884 पॉझिटिव्ह रुग्ण आले आहेत. म्हणजे प्रत्येक तासाला 37 नवीन रुग्ण. या अपयशाची जबाबदारी कोणी घेईल का? कुणाला तरी बलिदान द्यावे लागेल? मंत्री की बाबू?”

निरुपम यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर देखील निशाणा साधला. “कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आहेत की कोविड19 च्या संकटाला तोंड देण्यासाठी शिवसेनेच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार अपयशी ठरली आहे. या अपयशाला कोण जबाबदार आहे, हे त्यांनी सांगितले नाही. हे तेच चव्हाण साहेब आहेत, ज्यांनी शिवसेनेरोबर सरबकार स्थापनेचा सुवर्ण विचार मांडला होता”, असे ट्विट निरुपम यांनी केले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.