निर्भया प्रकरण : फाशी पुढे ढकलण्यासाठी आरोपीने भिंतीवर आपटले डोके

नवी दिल्ली – निर्भया प्रकरणातील चारही आरोपींना 3 मार्च रोजी अखेर फाशी देण्यात येणार आहे. यातीलच एका आरोपीने भिंतीवर डोके आपटून स्वत:ला जखमी करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, त्याला रुग्णालयात दाखल करून प्रथमोचार करण्यात आल्याचे समजत आहे.
निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी विनय शर्मा याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला होते. मात्र, हा दावा फेटाळत विनयची मानसिक स्थिती उत्तम असल्याचे तुरुंग प्रशासनाने सांगितले आहे.
दरम्यान, आरोपींनी सातत्याने फाशीपासून वाचण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात आणि राष्ट्रपतींकडे अर्ज केला होता. मात्र,आता आरोपीचे सर्व पर्याय संपले असून न्यायालय आणि राष्ट्रपतींनी त्यांच्या सर्व याचिका फेटाळल्या आहेत. तर न्यायालायने 3 मार्च ही फाशीची तारीख निश्चित केली आहे. न्यायालयाने फाशीची तारीख निश्चित केल्यापासून चारही आरोपी अत्यंत आक्रमकपणे वागत असल्याचे तुरुंग प्रशासनाने सांगितले आहे.




