Nira River flood | नीरा नदीला पूर ; काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

प्रभात वृत्तसेवा
वालचंदनगर – वीर धरणाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे वीर धरणातून ३३ हजार क्युसेस पाणी विसर्ग केल्याने नीरानदीमध्ये सोडल्यामुळे नीरा नदी तुटुंब भरून वाहत असल्यामुळे पोलीस व महसूल विभागाने अनेक गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.गेल्या आठवड्यात नीरा नदीवरील कळंबोलीच्या पुलावर संरक्षक लोखंडी कडे नसल्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
याच निरा नदीमध्ये वीर धरणातून पाणी विसर्ग केल्यामुळे निरा नदी ओव्हर फ्लो झाली आहे.पाण्याचा मोठ्या प्रमाणात प्रवाह सुरू असून नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपल्या विद्युत पंप व केबल्स काढलेल्या आहेत. मात्र, अनेक शेतकऱ्यांचे पाईप वाहून गेले आहेत.
नीरा नदी पात्रात खूप मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे दुचाकी, चारचाकी व अवजड वाहने चालवणाऱ्या चालकांना व प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत घालून प्रवास करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तात्काळ लक्ष देऊन नीरा नदीवरील छोट्या बंधाऱ्यांना व पुलाला संरक्षक कठडे बसवून घ्यावेत अशी मागणी नदीकाठच्या नागरिकांमधून होत आहे.

