नववीचे विद्यार्थी गणितात कच्चे !

पुणे – राष्ट्रीय शैक्षणिक गुणवत्तेत पंजाब, केरळने प्रथम क्रमांक पटकावला असून, महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर आहे. राज्यातील नववीचे विद्यार्थी गणितात कच्चे असल्याने या विषयाची गुणवत्ता २ टक्क्यांनी घटली आहे.
परख संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्राची गुणवत्ता ३ टक्क्यांनी वाढली आहे. परख ही संस्था राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) अंतर्गत कार्यरत आहे. परखने ४ डिसेंबर २०२४ रोजी केलेल्या शैक्षणिक सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच जाहीर झाला आहे.
सर्वेक्षणात तिसरी, सहावी व नववीच्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करताना राज्यातील ४ हजार ३१४ शाळांची पाहणी केली. १३ हजार ९३० शिक्षक आणि १ लाख २३ हजार ६५९ विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला. विद्यार्थ्यांमध्ये ५१ टक्के मुले, ४९ टक्के मुली होत्या. शहरी ५१ आणि ग्रामीण ४९ टक्के असे प्रमाण होते. या वेळी भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि परिसर अभ्यास या विषयांचे सर्वेक्षण केले.
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण २०२१ शी तुलना करता नववीचा गणित विषय वगळता सरासरी गुणवत्तेत तीन टक्के वाढ झाली आहे. नववी विद्यार्थ्यांत २०२१ मध्ये गणितांची ४० टक्के, तर २०२४ मध्ये ३८ टक्के एवढी गुणवत्ता आढळली. राज्य तिसरीच्या मूल्यमापनात सहाव्या, सहावीच्या मूल्यमापनात सातव्या, नववीच्या मूल्यमापनात दहाव्या क्रमाकांवर आहे. एकूणच माध्यमिक स्तरावर अजूनही सुधारणा करण्याची आवश्यकता सर्वेक्षणातून दिसून आली.
२०२४ ची गुणवत्ता टक्केवारी. (कंसातील आकडे २०२१ चे)






