निमरत कौरचा गुरुद्वारामधील व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले…

Nimrat Kaur | एकीकडे ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनच्या घटस्फोटाच्या अफवा सुरू आहेत. तर दुसरीकडे अभिषेकसोबत निमरत कौरचे नाव जोडले जात आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून निमरत चांगलीच चर्चेत आली आहे. शुक्रवारी तिने गुरु नानक जयंतीनिमित्त गुरुद्वाराला भेट दिली. यादरम्यानचा तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
यावेळी पापाराझींनी तिला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी गर्दी केली होती. तेव्हा निमरत त्यांना शांतता राखा असं आवाहन करताना दिसली. यानंतर बाहेर आल्यावर तिने सर्वांमध्ये प्रसाद वाटपही केलं. मात्र तिचा व्हिडीओ पाहिल्यानंतर ऐश्वर्याचे चाहते तिच्यावर टीका करत आहेत.
View this post on Instagram
या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी ‘ती काय शो ऑफ करत आहे’, ‘हिने ऐश्वर्याचे घर उद्ध्वस्त केले आहे’, ‘स्वतःसाठी लोक दुसऱ्यांची घरे फोडूनच प्रसादाचे वाटप करतात’, ‘आधी हिला कोणीच फॉलो करत नव्हतं पण आता अभिषेकसोबतच्या चर्चांमुळे सगळ्यांच्या हिच्यावर नजरा आहेत’, अशा कमेंट करत तिला ट्रोल केले आहे. इतकंच नाही तर अनेकांनी ऐश्वर्याशी तिची तुलना होऊच शकत नाही असंही म्हणाले. Nimrat Kaur |
दरम्यान, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांच्यातील मतभेदाचे कारण निम्रत कौरला जबाबदार धरले जात आहे. यावरूनचा आता तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे.
निमरत कौरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिला ‘द लंच बॉक्स’ सिनेमामुळे लोकप्रियता मिळाली. नंतर तिने अक्षय कुमारच्या ‘एयरलिफ्ट’ मध्ये काम केलं. अभिषेक बच्चनसोबत ती ‘दसवी’ सिनेमात दिसली होती. ज्यात अभिषेक आणि निम्रत यांनी पती-पत्नीची भूमिका साकारली होती. Nimrat Kaur |
हेही वाचा:





