भारताचा मोठा विजय ! निमिषा प्रियाचे वाचले प्राण ; मृत्युदंडाची शिक्षा अखेर रद्द , या प्रकरणात नेमकं काय घडलं वाचा

Nimisha Priya Case । येमेनमध्ये भारतीय परिचारिका निमिषा प्रियाला देण्यात आलेली मृत्युदंडाची शिक्षा अखेर पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. भारताचे ग्रँड मुफ्ती कंठापुरम एपी अबुबकर मुसलियर यांच्या कार्यालयाने ही माहिती देणारे निवेदन जारी केले आहे. मात्र, निवेदनात असेही स्पष्ट करण्यात आले आहे की येमेनी सरकारकडून अद्याप अधिकृत लेखी पुष्टी मिळालेली नाही. निवेदनात म्हटले आहे की, “निमिषा प्रियाची मृत्युदंडाची शिक्षा, जी आधी स्थगित करण्यात आली होती, ती आता पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.”
एका वृत्तसंस्थेनुसार,”ग्रँड मुफ्तींच्या कार्यालयाने,”येमेनची राजधानी सना येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, निमिषा प्रियाचे प्रकरण २०१८ पासून आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आहे. निमिषा प्रियावर तिच्या व्यावसायिक भागीदाराची हत्या करून नंतर मृतदेहाचे तुकडे केल्याचा आरोप आहे. मार्च २०१८ मध्ये तिला हत्येचा दोषी ठरवण्यात आले होते आणि २०२० मध्ये येमेनी न्यायालयाने तिला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती.
निमिषाला मृत्युदंडाची शिक्षेची संपूर्ण कहाणी Nimisha Priya Case ।
केरळमधील ३४ वर्षीय नर्स निमिषा प्रिया मूळची पलक्कड जिल्ह्यातील आहे. २००८ मध्ये निमिषा नोकरीच्या शोधात येमेनला गेली होती. ती एका ख्रिश्चन कुटुंबातील आहे. येमेनची राजधानी साना येथे तिची भेट स्थानिक नागरिक तलाल अब्दो महदीशी झाली, ज्याच्यासोबत तिने भागीदारीत क्लिनिक सुरू केले. काही काळानंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला.
समोर आलेल्या माहितीनुसार, महदीने निमिषाला त्रास देण्यास सुरुवात केली आणि सार्वजनिक ठिकाणी स्वतःला तिचा पती म्हणवून घेऊ लागला. इतकेच नाही तर त्याने निमिषाचा पासपोर्टही जप्त केला जेणेकरून ती भारतात परत येऊ नये.
येमेनी अधिकाऱ्यांच्या मते, निमिषा हिने २०१७ मध्ये तिचा पासपोर्ट परत मिळवण्यासाठी महदीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हा प्रयत्न घातक ठरला. कारण महदीचा मृत्यू संभाव्य अति प्रमाणात घेतल्याने झाला. त्यानंतर येमेनी अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली.
२०१८ मध्ये तिला हत्येचा दोषी ठरवण्यात आले आणि २०२० मध्ये येमेनी न्यायालयाने तिला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. हे प्रकरण आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले. मानवाधिकार संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तिच्या शिक्षेविरुद्ध मोहीम सुरू केली.
परिस्थिती अशीच बिकट झाली Nimisha Priya Case ।
यमेनचे अध्यक्ष रशाद अल-अलीमी यांनी डिसेंबर २०२४ मध्ये मृत्युदंडाला मान्यता दिली आणि जानेवारी २०२५ मध्ये हुथी बंडखोर नेते महदी अल-मशात यांनीही त्याची पुष्टी केली तेव्हा परिस्थिती अधिक गंभीर झाली. यानंतर, भारतात धार्मिक आणि राजनैतिक पातळीवर तिच्या बचावाचे प्रयत्न तीव्र झाले. मात्र आता ग्रँड मुफ्तींच्या कार्यालयाने माहिती दिली आहे की येमेनमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर, निमिषाची मृत्युदंड रद्द करण्यात आली आहे, जरी येमेनी सरकारकडून अधिकृत पुष्टी अद्याप आलेली नाही.





