Nimisha Priya । येमेनमध्ये तुरुंगात असलेल्या भारतीय परिचारिका निमिषा प्रियाला फाशीपासून वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. केरळमध्ये राहणाऱ्या निमिषाला हत्येचा दोषी ठरवण्यात आले आहे. तिला १६ जुलै रोजी फाशी देण्यात येणार आहे. ‘सेव्ह निमिषा प्रिया अॅक्शन कौन्सिल’ नावाच्या संघटनेने भारत सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. दरम्यान ,, सोमवार, १४ जुलै रोजी सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. याचिकाकर्त्याने काय म्हटले? Nimisha Priya । याचिका दाखल करणाऱ्या संघटनेच्या वतीने वरिष्ठ वकील आर बसंत यांनी न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर हा विषय मांडला. बसंत यांनी याविषयी, “येमेनच्या कायद्यात अशी तरतूद आहे की मृताचे कुटुंब परस्पर करार आणि रोख रकमेनंतर खुन्याला माफ करू शकते. अशा परिस्थितीत, जर केंद्र सरकारने हस्तक्षेप केला तर तोडगा काढता येईल.” असे म्हटले आहे. निमिषा प्रियावर कोणते आरोप आहेत? निमिषा प्रिया २०१७ मध्ये येमेनी नागरिक तलाल अब्दो महदी यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरली आहे. २०२० मध्ये तिला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. याचिका दाखल करणाऱ्या संघटनेने म्हटले आहे की, “३७ वर्षीय निमिषा स्वतः पीडित आहे. महदीने तिचा पासपोर्ट बराच काळ जप्त केला होता. तो तिला सतत त्रास देत होता” याचिकाकर्त्याने मोठा दावा Nimisha Priya । याचिकाकर्त्याने म्हटले आहे की, “महदीने निमिषा यांचा पासपोर्ट बेकायदेशीरपणे जप्त केला त्या काळात तिने कायदेशीर मदत घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ती यशस्वी झाली नाही. निमिषा यांनी तिचा पासपोर्ट मिळविण्यासाठी तिला झोपेचे इंजेक्शन दिले. परंतु ती मरण पावली. तिला मारण्याचा तिचा कोणताही हेतू नव्हता.”