Nikki Tamboli- Arbaz Patel : निक्की आणि अरबाजचे ब्रेकअप? एकमेकांना केले अनफॉलो
Nikki Tamboli- Arbaz Patel : दोघांनीही इन्स्टाग्रामवर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली

Nikki Tamboli- Arbaz Patel : ‘बिग बॉस मराठी ५’ मधील लोकप्रिय जोडी निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी चर्चेचे कारण त्यांचा कोणताही नवीन शो नसून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा आहेत. नुकतीच दोघांनीही इन्स्टाग्रामवर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.
जवळपास २ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर हे दोघे वेगळे झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. निक्की आणि अरबाजने इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले असून, अरबाझने फसवणुकीशी (चीटिंग) संबंधित क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.
अरबाजची पोस्ट
“आपल्या जोडीदाराची फसवणूक करणे, त्यानंतर घरी परतल्यावर त्यांच्या डोळ्यात पाहून ‘मी तुझ्यावर प्रेम करतो/करते’ असे सांगणे, हा अनादराचा एक वेगळाच आणि अत्यंत खालच्या पातळीचा प्रकार आहे. जे बोलायचे होते ते मी बोललो आहे.”
निक्कीची पोस्ट
अरबाजच्या या पोस्टनंतर लगेचच निक्की तांबोळीनेही एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली. ज्यात तिने लिहिले, “जे सत्य सांगितले जात नाही ते असे, अफेअर्स केवळ एखादी नवीन व्यक्ती अत्यंत आकर्षक वाटते म्हणून होत नाही, तर जुन्या जोडीदाराने दिलेली वचने पाळणे किंवा त्यांचा आदर करणे थांबवल्यामुळे ते घडतात.”
दरम्यान, अरबाज आणि निक्कीची ‘बिग बॉस मराठी ५’ दरम्यान या दोघांची भेट झाली होती. शोमध्ये त्यांच्यातील जवळीक वाढली आणि त्यानंतर ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले होते. या दोघांनी ‘द ५०’ या रिएलिटी शोमध्येही एकत्र सहभाग घेतला होता. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून ब्रेकअपचा स्पष्ट इशारा मिळत असला, तरी या जोडीने अजूनही कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
हेही वाचा:







