US Presidential Election : निक्की हेले देणार डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान

चार्ल्सटन – साऊथ कॅरोलिना प्रांताच्या माजी गव्हर्नर संयुक्त राष्ट्रात अमेरिकेच्या राजदूत राहिलेल्या वरिष्ठ मुत्सदी निक्की हेले यांनी 2024 मध्ये होणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचे घोषित केले आहे.
रिपब्लिकन पार्टीकडून अध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्यासाठी माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रयत्नशील आहेत. मात्र निक्की हेले यांनी आपली उमेदवारी घोषित केल्यामुळे ट्रम्प यांना उमेदवारीच्या शर्यतीसाठी मोठे आव्हान दिले जाणार आहे.
निक्की हेले यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या उमेदवारीची घोषणा केली आहे. आपण ट्रम्प यांना आव्हान देणार नसल्याचे हेले यांनी दोन वर्षांपूर्वी म्हटले होते. मात्र आता त्यांनी आपला विचार बदललेला दिसतो आहे. अन्य काही समिकरणेही आता बदलली आहेत.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/in-soft-diplomacy-outreach-pm-meets-film-stars-cricketers-startup-biggies/
देशासमोरची आर्थिक आव्हाने आणि पिढीबरोबरचे विचार देखील बदलले असल्यामुळे आपल्याला निर्णय बदलायला लागल्याचे हेले म्हणाल्या. त्यांच्या या म्हणण्यामध्ये ट्रम्प यांच्या वाढत्या वयाचा संदर्भ असल्याचे लक्षात येते आहे. ट्रम्प आता 78 वर्षांचे आहेत. तर हेले या 51 वर्षांच्या आहेत. 2024 च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी हेले आगामी काही महिन्यातच आपला प्रचार सुरू करणे अपेक्षित आहे.





