Pune: शिवसेना शहर उपप्रमुखांच्या मुलाची आत्महत्या
Updated On:

पुणे – शिवसेनेचे पुणे शहर उपप्रमुख बाळासाहेब मालुसरे यांचा मुलगा निखील यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज समोर आली आहे. निखील बाळासाहेब मालुसरे (28, शुक्रवार पेठ, पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.
निखील यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर तातडीने उपचारासाठी केईएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची खडक पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.





