Pune Crime News : प्रेमप्रकरणातून नायजेरियन नागरिकाची हत्या; दोन आरोपी ताब्यात

पुणे : काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रेमप्रकरणाच्या कारणावरून झालेल्या वादातून एका नायजेरियन नागरिकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना आज १२ जानेवारी २०२६ रोजी पिसोळी परिसरात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एनकेनिया पेंट्रिशिया मबिगा (रा. लिमरास हाइट्स सोसायटी, बालाजी पद्मावती नगर, धर्मावत पेट्रोलपंपाजवळ, पिसोळी, पुणे) या नायजेरियन महिलेच्या घरी येमेका क्रिस्टीएन (४०, रा. फुरसुंगी, मूळ नायजेरिया) हे जेवणासाठी गेले होते. यावेळी येमेका क्रिस्टीएन यांचा नायेमेका मादूबुची ओनिया, किन्सली, ओबी व ओजे ओजगवा या नायजेरियन इसमांशी प्रेमप्रकरणाच्या कारणावरून वाद झाला.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून, संबंधित आरोपींनी संगनमत करून येमेका क्रिस्टीएन यांना डोक्यावर, हातावर व पायावर जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत त्यांना त्यांचे मित्र गिफ्ट सिव्होनस ऊटाह ( ३९, व्हाइस प्रेसिडेंट – नायजेरियन स्टुडंट युनियन, पुणे, रा. उंड्री) यांनी उपचारासाठी रुबी हॉल हॉस्पिटल, वानवडी येथे दाखल केले. मात्र उपचारादरम्यान येमेका क्रिस्टीएन यांचा मृत्यू झाला.




