Nigeria Plane crash: नायजेरियात हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात ; ३२ जणांचा मृत्यू, ३ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा
Nigeria Plane crash: नायझेरियमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. नायजेरियन हवाई दलाचे विमान कोसळून ३२ जणांचा मृत्यू झाला आहे.

Nigeria Plane crash: नायझेरियमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. नायजेरियन हवाई दलाचे विमान कोसळून ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे नायझेरियन सरकारने तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. अलिकडच्या वर्षांतील नायजेरियामधील ही सर्वात भीषण विमान दुर्घटनांपैकी एक आहे.
हवाई दल प्रमुख एअर मार्शल संडे केल्विन अनेके यांच्यासह ३२ जणांचा या अपघातात मृत्यू झाला. राष्ट्राध्यक्ष आणि हवाई दलाच्या माहितीनुसार, नायजेरियाच्या दक्षिणेकडील बेनिन सिटी याठिकाणी लागोस या आर्थिक केंद्राकडे नियमित मोहिमेवर निघालेले प्रवासी विमान सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास (०८०० जीएमटी) नैऋत्य ओंडो राज्यातील इग्बोकोडा येथे कोसळले.
राष्ट्रपती टिनुबूकडून राष्ट्रीय शोक जाहीर Nigeria Plane crash:
एएफपीनुसार, राष्ट्रपती टिनुबू यांनी सांगितले की, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी त्यांनी नायजेरियन हवाई दलाला अपघाताच्या कारणांची तातडीने सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
टिनुबू यांच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रपतींनी अपघातात ठार झालेल्या २५ प्रवासी आणि ७ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांप्रति तीव्र शोक व्यक्त केला आहे. सशस्त्र दल आणि संपूर्ण राष्ट्रासाठी हा एक दुःखद क्षण आहे.
विमान अपघातात ३२ जणांचा मृत्यू
राष्ट्रपतींनी अपघातात ठार झालेल्या हवाई दलाच्या जवानांसाठी तीन दिवसांचा राष्ट्रीय शोकही जाहीर केला आहे. त्यांनी अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ देशभरात ध्वज अर्ध्यावर फडकवण्याचे आदेशही दिले. एटीआर-४२ हे विमान नौदल तळाजवळ कोसळले.
हे दोन इंजिन असलेले टर्बोप्रॉप विमान असून त्यात ३० ते ५० प्रवाशांची बसण्याची क्षमता आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नदीजवळ लोकांची गर्दी दिसत आहे, तर बचाव पथक बोटींमधून परिसरात शोध घेत असल्याचे दिसत आहे.
नायजेरियामध्ये यापूर्वी विमान अपघात कधी झाले आहेत? Nigeria Plane crash:
मे २०२१ मध्ये अशीच एक घटना घडली होती, ज्यात नायजेरियाचे सर्वोच्च लष्करप्रमुख, लेफ्टनंट जनरल इब्राहिम अत्ताहिरू आणि इतर १० अधिकारी ठार झाले. उत्तरेकडील कादुना राज्यातील एका विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना खराब हवामानामुळे त्यांचे विमान कोसळले.
ऑगस्ट २०१५ मध्ये, उत्तर नायजेरियामध्ये एक लष्करी विमान घरावर कोसळले, ज्यात सात जणांचा मृत्यू झाला. त्याच महिन्याच्या सुरुवातीला, लागोसमध्ये एका खाडीत हेलिकॉप्टर कोसळले, ज्यात अमेरिकन वैमानिकासह सहा जणांचा मृत्यू झाला.


