Valentine Day साठी निक-प्रियांका व्हेकेशनवर ! बर्फातील रोमँटिक फोटो व्हायरल

मुंबई – प्रियांका चोप्रा आणि निक जोनस हे बॉलिवूड आणि हॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात फेमस जोडपे आहे. अनेकदा दोघेही सोशल मीडियावर आपलं प्रेम व्यक्त करत असतात. नुकतच निकने पत्नी प्रियांकासोबत काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये दोघेही क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसत आहेत.
निक आणि प्रियांका सध्या एकमेकांसोबत चांगला वेळ घालवत आहेत. दोघांसोबत त्यांची मुलगी मालती मेरी देखील दिसत आहे. हे सर्वजण बर्फात मस्ती करताना पाहायला मिळत आहेत.निक आणि प्रियांका बर्फात एन्जॉय करताना दिसत आहेत. फोटोमध्ये प्रियांकाने पांढरा जंपसूट घातला असून त्यावर लाल आणि निळ्या रंगाचे चेक प्रिंट आहेत. यासोबतच ग्रे शेड्सही कॅरी केले आहे. दुसरीकडे, निक कॅपसह काळ्या आणि पांढर्या ट्रॅकसूटमध्ये दिसत आहे.
View this post on Instagram
फोटोंमध्ये निक आणि प्रियंकासोबत मालतीही बर्फाचा भरपूर आनंद घेताना दिसत आहे. प्रियंकाने अखेर तिची मुलगी मालतीचा गोंडस चेहरा सर्वांना दाखवला आहे.मालती मेरी चेहरा पाहून फॅन्सने कमेंट्सचा वर्षाव केला होता. प्रियांका निकच्या फॅमिली टूरवरून अनेकांनी त्यांनी खूप प्रश्न विचहरले आहेत.





