बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती आणि लोकप्रिय अमेरिकन गायक निक जोनास एका कॉन्सर्टदरम्यान स्टेजवर कोसळला. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये निक त्याचा भाऊ केविन जोनस आणि जो जोनास यांच्यासोबत स्टेजवर परफॉर्म करत आहे. यादरम्यान त्याचा तोल गेला आणि तो स्टेजवरून पडल्याचे दिसते.
व्हायरल व्हिडिओमध्ये निक स्टेजवर परफॉर्म करताना दिसतो. मात्र अचानक तोल जाऊन तो खाली पडतो. पण पुन्हा उठून तो उभा राहतो. इतकेच काय तर न थांबता पुन्हा गायला सुरुवात करतो. त्याचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्याच्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तर एका युझरने कमेंट करत ‘निकला दुखापत झाली नसेल ना’, अशी चिंताही व्यक्त केली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, जोनास ब्रदर्सने शनिवारी न्यूयॉर्कमधील यांकी स्टेडियममध्ये म्युझिक कॉन्सर्ट आयोजित केला होता. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या या कॉन्सर्टमध्ये प्रियांका देखील उपस्थित होती. निक गाणे गात असताना प्रियांका भावुक झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले. व्हायरल व्हिडिओत ती डोळ्यातील अश्रू पुसताना दिसते.