Priyanka Chopra : लग्नाआधी निक जोनासने प्रियांकाकडे मागितला होता ‘हा’ खास फोटो; अभिनेत्रीने सांगितली खास आठवण
Priyanka Chopra : आज निक भारतीय चाहत्यांमध्ये इतका लोकप्रिय झाला आहे की, त्याला प्रेमाने 'नॅशनल ब्रदर-इन-लॉ' अशीही उपाधी दिली जाते.

Priyanka Chopra : बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक-अभिनेता निक जोनास यांच्या लग्नाची सुरुवातीला बरीच चर्चा झाली होती. दोघांच्या वयातील अंतर आणि भिन्न संस्कृतींमुळे त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले.
मात्र, काळानुसार त्यांच्या नात्यातील प्रेम, परस्परांचा आदर आणि भारतीय परंपरांप्रती निकचा जिव्हाळा पाहून चाहत्यांची मतं बदलली. आज निक भारतीय चाहत्यांमध्ये इतका लोकप्रिय झाला आहे की, त्याला प्रेमाने ‘नॅशनल ब्रदर-इन-लॉ’ अशीही उपाधी दिली जाते.
अलीकडेच ‘हे जोनास’ या पॉडकास्टमध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी त्यांच्या लव्हस्टोरीच्या सुरुवातीच्या दिवसांतील काही खास आणि रंजक आठवणी शेअर केल्या.
प्रियांकाने सांगितले की, तिच्याशी पहिल्यांदा संपर्क साधण्यामागे निकचा भाऊ केविन जोनासचा मोठा वाटा होता. केविनने निकला ‘क्वांटिको’ हा शो पाहण्याचा सल्ला दिला होता. जरी निकने तो शो प्रत्यक्षात पाहिला नव्हता, तरी एका बिलबोर्डवर प्रियांकाचा फोटो पाहिल्यानंतर तो तिचा चाहता झाला. त्यानंतर त्याने प्रियांकाला थेट डीएम पाठवण्याचा निर्णय घेतला.
पॉडकास्टमध्ये निक जोनासने प्रियांकाला पाठवलेला पहिला ट्विटर डीएमही वाचून दाखवण्यात आला. त्या मेसेजमध्ये निकने लिहिले होते, “हाय, अनेक लोकांकडून ऐकले आहे की आपण एकदा भेटायला हवे. मला वाटते, त्यांच्या सल्ल्याचे पालन करायला हवे. तू सध्या लॉस एंजेलिसमध्ये आहेस का?”
यावर प्रियांकाने सांगितले की, त्यांचा कॉमन मित्र ग्रॅहम रॉजर याने यापूर्वीच तिला निकबद्दल माहिती दिली होती. त्यामुळे तिने निकला उत्तर देताना लिहिले, “ग्रॅहमने तुझ्याबद्दल खूप काही सांगितले आहे. आपण टेक्स्टवर बोलूया… थोडं खाजगीत. कारण माझ्या टीमलाही या अकाउंटचा ॲक्सेस आहे.” त्यानंतर दोघांमध्ये खासगी चॅट सुरू झाले आणि याच संवादातून त्यांच्या नात्याची सुरुवात झाली.
Mouni Roy : ‘बंद करा..!’ मौनी रॉय पापाराझींवर संतापली
यानंतर निकने प्रियांकासमोर एक अनोखी अट ठेवली. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहोत ती खरोखर प्रियांकाच आहे, याची खात्री करून घ्यायची असल्याने त्याने तिला टाइमस्टॅम्पसह एक फोटो पाठवण्याची विनंती केली.
या आठवणीचा उल्लेख करताना प्रियांका हसत म्हणाली, “निकला खात्री करून घ्यायची होती की मीच त्याच्याशी बोलत आहे. त्यामुळे त्याने माझ्याकडे टाइमस्टॅम्पसह फोटो मागितला. सुरुवातीला मला वाटलं, ‘या माणसाला माझ्यावर इतक्या लवकरच संशय आला आहे का?’ पण त्याचा प्रामाणिक आणि स्पष्ट स्वभाव मला खूप आवडला.”
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी १ डिसेंबर २०१८ रोजी राजस्थानमधील जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये ख्रिश्चन परंपरेनुसार विवाह केला. त्यानंतर २ डिसेंबर २०१८ रोजी त्याच ठिकाणी कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत पारंपरिक हिंदू रीतीरिवाजांनुसार त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. दोघेही सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असतात.





