लखनऊ : आयपीएल 2025 चा जवळजवळ अर्धा सीजन संपत आला आहे. या स्पर्धेत अनेक हाय होल्टेज सामने पाहायला मिळत आहेत. स्पर्धेचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर आता प्ले-ऑफची रेस आणखी थरारक झाली आहे. टॉप 4 मध्ये स्थान मिळवण्यासाठी सगळे संघ संघर्ष करताना दिसत आहेत. आज लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना पार पडणार आहे. या सामन्याच्या आधी लखनऊ सुपरजाएंट्सचा खेळाडू निकोलस पूरनचा (Nicholas Pooran) एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. “Bas apni Lucknow ki team jeetti rehni chahiye” 💙 pic.twitter.com/DJkLKzMkP3 — Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 21, 2025 निकोलस पूरन आणि त्याच्या फॅनचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल 12 एप्रिलला गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना पार पडला. इकाना स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात पूरनने (Nicholas Pooran) सिक्स मारला, यामुळे स्टेडियममध्ये बसलेला प्रेक्षक जखमी झाला.आज दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या मॅचआधी तयारी करत असताना जखमी झालेला चाहता पूरनला भेटायला आला, तेव्हा पूरनने त्याला स्वत:ची सही केलेली टोपी गिफ्ट दिली. नबील असं बॉल लागलेल्या चाहत्याचं नाव आहे. लखनऊ सुपरजाएंट्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या भेटीनंतर ‘मला खूप चांगलं वाटत आहे. पूरन सरांनी मला कॉल केला आणि इकडे बोलवून घेतलं, मीही लगेच आलो. पूरन सर मला येऊन भेटले, त्यांनी मला बरा आहेस का? विचारलं. मी उद्याची मॅच पाहायला येणार आहे’, अशी प्रतिक्रिया नबीलने दिली आहे.