काश्मीरातील दहशतवादी हल्ल्याचा NIA करणार तपास
Updated On:

श्रीनगर – काश्मीरात नुकताच सुरनककोट येथे दहशतवाद्यांनी लष्करावर हल्ला केला होता, त्यात चार जवान शहीद झाले होते या प्रकरणाचा तपास एनआयए तर्फे केला जाणार आहे. या तपासासाठी एनआयएच्या तज्ज्ञांचे एक पथक लवकरच घटनास्थळी रवाना होणार आहे.
या हल्ल्यामुळे काश्मीरातील दहशतवाद्यांचे आव्हान पुर्ण संपुष्टात आलेले नाही असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे केंद्राने या प्रकरणाच्या तपासात आपली महत्वाची यंत्रणाही कामी लावली आहे.
या दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीसाठी लष्कराने आठ जणांना ताब्यात घेतले होते. त्यातील तिघांचा लष्करी कोठडीत मृत्यू झाल्याने त्यावरूनही काश्मीरातील वातावरण सध्या तापले आहे. या मृत्युच्या चौकशीचा आदेश लष्कराने दिला असून जम्मू काश्मीर पोलिसही या प्रकरणाचा तपास करीत आहेत.





