Neymar Jr Retires : नॉर्वेने ब्राझीलला बाहेर करताच भावुक झालेल्या नेमारची तडकाफडकी निवृत्ती; म्हणाला, ‘आता सर्व संपलं…’
Neymar Jr Retires : नॉर्वेविरुद्धच्या २-१ अशा पराभवानंतर ब्राझीलचा महान फुटबॉलपटू नेमार जुनियर (Neymar Jr) याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली आहे.

Neymar Jr Announces Retirement From International Football : फिफा फुटबॉल विश्वचषक २०२६ (FIFA World Cup 2026) मधून एक अत्यंत धक्कादायक आणि भावुक करणारी बातमी समोर आली आहे. ५ वेळच्या जगज्जेत्या ब्राझीलचे ६ व्यांदा विश्वविजेता बनण्याचे स्वप्न भंगले असून, नॉर्वेविरुद्धच्या २-१ अशा पराभवानंतर ब्राझीलचा महान फुटबॉलपटू नेमार जुनियर (Neymar Jr) याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली आहे.
नेमार जुनियरच्या या घोषणेमुळे ब्राझीलच्या फुटबॉल इतिहासातील एका सुवर्ण आणि जादुई युगाचा अंत झाला आहे. सामन्यानंतर मैदानावरच ढसाढसा रडताना नेमार म्हणाला, “मी देशासाठी सर्वस्व पणाला लावले, पण आता सर्व काही संपले आहे. जिथून हा प्रवास सुरू झाला होता, तो आज इथेच थांबला आहे.”
🚨 End of an era.
Neymar has announced his retirement from international football with Brazil.“I tried. I tried. It started here at MetLife Stadium and I finished here. It is now over.”
From his 2010 debut at the same stadium to tonight’s heartbreaking 2-1 R16 exit vs Norway… pic.twitter.com/kmUHNYuHiG
— Dr RK Singh (@DrRupak) July 6, 2026
मेटलाइफ स्टेडियमवर रंगला थरार; हालंड ठरला कर्दनकाळ –
Haaland led Norway to eliminate Brazil and set-up a Quarter-final clash with England ✅️
The Norwegians remain unbeaten against Brazil 👏 pic.twitter.com/pBaItzcfmw
— CenterKick (@Centerkick_) July 6, 2026
न्यू जर्सीच्या मेटलाइफ स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ब्राझीलने सुरुवातीपासून नॉर्वेवर दबाव आणला होता. मात्र, नॉर्वेच्या मजबूत बचावामुळे त्यांना यश आले नाही. सामन्याच्या ७९ व्या मिनिटाला आंद्रेस स्केजलडेरपच्या पासवर एर्लिंग हालंडने (Erling Haaland) उत्कृष्ट हेडर मारत नॉर्वेला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
History for Norway 🇳🇴
They have qualified for the @FIFAWorldCup quarter-finals for the first time ever, following their 2-1 win over Brazil. pic.twitter.com/lNpcvAwO2C
— FIFA (@FIFAcom) July 5, 2026
यानंतर अवघ्या काही मिनिटांतच हालंडने दुसरा गोल करत ब्राझीलला सामन्यातून पूर्णपणे बाहेर फेकले. इंजरी टाईममध्ये नॉर्वेच्या लिओ ओस्टीगार्डने कॅसेमीरोवर फाऊल केल्यामुळे ब्राझीलला पेनल्टी मिळाली, ज्यावर १० व्या मिनिटाला नेमारने गोल करून पराभवाचा अंतर २-१ असे कमी केले. या ऐतिहासिक विजयासह नॉर्वेने ८८ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच विश्वचषकाच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
१३० सामने, ८० गोल; असा राहिला नेमारचा ऐतिहासिक प्रवास –
In case you missed Brazil vs Norway match, Here is a better highlights of the match.
pic.twitter.com/7MhCrq0NGZ— Speedline (@speedlne) July 6, 2026
निवृत्तीच्या सामन्यात केलेला गोल हा नेमारच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ८० वा गोल ठरला. त्याने ब्राझीलसाठी एकूण १३० सामने खेळले, ज्यात ८० गोल करण्यासोबतच ५९ वेळा इतर खेळाडूंना गोल करण्यासाठी असिस्ट (मदत) केले. तो ब्राझीलच्या फुटबॉल इतिहासात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू म्हणून निवृत्त झाला आहे. नेमारने २०१३ मध्ये ब्राझीलला फिफा कॉन्फेडरेशन कप जिंकून दिला होता, तर २०१६ च्या रियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक (Gold Medal) मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता.





