वृत्तपत्र विक्रेता ते राज्यपाल; जाणून घ्या हरिभाऊ बागडे यांचा राजकीय प्रवास…

Haribhau Bagde | राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी राजस्थान, तेलंगणा आणि झारखंडसह 9 राज्यांमध्ये राज्यपालांची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी सी पी राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर महाराष्ट्राचे माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे दिग्गज आणि निष्ठावंत नेते म्हणून त्यांनी ओळख आहे. सुरुवातीला त्यांनी वर्तमानपत्रे विकण्याचेही काम केले. खडतर मेहनत करत सुरू झालेला त्यांचा प्रवास आता राज्यपाल पर्यंत पोहचला आहे. हरिभाऊ बागडे यांचा राजकीय प्रवासाची सुरूवात कशी झाली ते जाणून घेऊयात…
हरिभाऊ बागडे यांचा प्रवास –
हरिभाऊ बागडे यांचा जन्म १७ ऑगस्ट १९४५ मध्ये महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झाला. फुलंब्री शहरातील एका मराठा कुटुंबात जन्मलेले हरिभाऊ राज्यातील महत्त्वाचे नेते बनले. त्यांचे शिक्षण सरस्वती भवन शाळेत झालं. दहावीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतले आहे. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सहभागी झाले होते. त्यानंतर १९८५ मध्ये औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून ते भाजपाच्या तिकिटावर निवडून आले.
हरिभाऊंचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. त्यांचे वडील शेतकरी होते. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी अनेक वर्षे औरंगाबादच्या फुलंब्री येथे घरोघरी वर्तमानपत्रे विकली. त्यांना शेती कामाचीही विशेष आवड होती, त्यांनी आपल्या वडिलांना शेती कामातही मदत केली. त्यांनी आपल्या घराचे नावही कृषी योग असे ठेवले आहे.
राजकीय प्रवास
हरिभाऊ किसनराव बागडे यांनी वयाच्या १३ व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला. १९८५ मध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दिला सुरुवात झाली. त्यावेळी त्यांनी औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर भाजपकडून निवडून आले होते. यापुढे आमदार म्हणून त्यांनी फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे सलग पाच वेळा प्रतिनिधीत्व केले आहे. Haribhau Bagde |
१९९५ ते १९९९ या युती सरकारच्या काळात त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाची जबाबदारी होती. २००३ आणि २००९ साली हरिभाऊ बागडेंना फुलंब्री मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला होता. २०१९ मध्ये या मतदारसंघातून पुन्हा निवडून आले. २०१४ मध्ये भाजपने महाराष्ट्रात युती सरकार स्थापन केले. यावेळी त्यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आता हरिभाऊ बागडे राजस्थानचे ४५ वे राज्यपाल बनले आहे. Haribhau Bagde |
हेही वाचा:





