Pune District : तीन पिढ्यांपासून वृत्तपत्र वितरण सेवा
Pune District : पुणे शहरातून आलेली वृत्तपत्रे क्रमवारीने लावून स्वतःच्या दुचाकीवर आणि बंधू मिळून निम्म्या दौंड तालुक्यामध्ये वृत्तपत्रांचे वितरण करतात. पहाटे चारपासून दुपारी दोनपर्यंत दहा तास यांचा हा प्रवास चालतो. बोरिपार्धी, राहू, यवत, केडगाव, वडगाव, टाकळी आदी गावांत वृत्तपत्रे पोहोचवतात.

राहू : वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त तीन पिढ्यांपासून वृत्तपत्र वितरणाची सेवा अविरतपने सुरू ठेवणारे दौंडमधील मिनेश विजय गुजर यांचा विशेष गौरव करण्यात आला आहे. या आगळ्यावेगळ्या सत्कार सोहळ्याने गुजर हे भारावून गेले. यावेळी “ही सेवा म्हणजे केवळ व्यवसाय नाही, तर आमची परंपरा आणि जबाबदारी आहे, असे भावनिक उद्गार मिनेश गुजर यांनी काढले.
यावेळी वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त स्थानिक नागरिक, वाचनप्रेमी, पत्रकार संघाच्या वतीने मिनेश गुजर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. मिनेश हे विजय दगडू गुजर यांचे सुपुत्र असून दगडू गुजर यांचे नातू आहेत. दगडू गुजर यांनी दौंडमध्ये वृत्तपत्र विक्रीस सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांचे सुपुत्र विजय गुजर यांनी ही परंपरा ठेवली. आता ३३ वर्षे मिनेश गुजर यांनी ती परंपरा सुरू ठेवली आहे. दररोज पहाटे साडेचार वाजता मिनेश आपल्या कामाला सुरुवात करतात.
पुणे शहरातून आलेली वृत्तपत्रे क्रमवारीने लावून स्वतःच्या दुचाकीवर आणि बंधू मिळून निम्म्या दौंड तालुक्यामध्ये वृत्तपत्रांचे वितरण करतात. पहाटे चारपासून दुपारी दोनपर्यंत दहा तास यांचा हा प्रवास चालतो. बोरिपार्धी, राहू, यवत, केडगाव, वडगाव, टाकळी आदी गावांत वृत्तपत्रे पोहोचवतात. दोन हजार घरांपर्यंत वृत्तपत्रे पोहोचवण्याची जबाबदारी ते एकटेच सांभाळतात. पाऊस, थंडी किंवा उन्हाच्या झळा असोत. गेल्या ३३ वर्षांपासून त्यांनी एकही दिवस काम थांबवलेले नाही. यावेळी दैनिक प्रभात चे वार्ताहर भाऊ ठाकुर, वार्ताहर संदीप सोनवणे, वार्ताहर संदीप नवले, वार्ताहर रवींद्र खोरकर, वार्ताहर संतोष काळे, नागरिक उपस्थित होते.





