कोल्हापूर | मार्केट यार्डात रेल्वेची बोगी उलटली…

Updated On:
कोल्हापूर | मार्केट यार्डात रेल्वेची बोगी उलटली…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर रेल्वे स्थानकात रविवारी रेल्वे डब्याला आग लागल्याची घटना घडली. ही घटना ताजी असताना सोमवारी (ता.६ डिसेंबर) दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्डमधील रेल्वे गुडसमध्ये बोगी उलटली. मालगाडीतील सिमेंट पोती उतरताना बोगी उलटली. या घटनेत सहा हमाल जखमी आहेत. जखमी हमाल विक्रमनगर परिसरातील आहेत.

मार्केट यार्डमधील गुडस मार्केटमध्ये रेल्वे लाइन तीन नंबरवर सिमेंटची पोती भरून मालगाडी थांबली होती. सोमवारी या मालगाडीतील सिमेंटची पोती उतरण्यास सुरुवात झाली. हमालांनी जवळपास एक हजारहून अधिक सिमेंट पोती उतरवले होते. तीनशेहून अधिक सिमेंट पोती उतरणे शिल्लक होते. हे काम सुरू असताना बोगी उलटली.

बोगी उलटल्याने परिसरात खळबळ उडाली. सिमेंटच्या पोत्याखाली सहा हमाल अडकले होते. त्यांना बाहेर काढून उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलविले. या घटनेची माहिती समजताच पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

या घटनेत जखमी झालेले सगळे हमाल विक्रमनगर भागातील आहेत. सुरेश सांडुगडे, सिराज आदालखान, राजू गेंड, सनीउल्ला चमनशेख, सादिक शब्बी शेख, मुजाहिद्दीन मुजावर अशी जखमींची नावे आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Mahadev Jankar : "गोकुळ दूध संघाच्या खाजगीकरणासाठी मला दोनशे कोटी रुपयांची ऑफर आली होती"; महादेव जानकरांचा गौप्यस्फोट

2026-10-03 07:49:09

Mahadev Jankar : "गोकुळ दूध संघाच्या खाजगीकरणासाठी मला दोनशे कोटी रुपयांची ऑफर आली होती"; महादेव जानकरांचा गौप्यस्फोट

Dhananjay powar : '...तर तिच्या कानाला धरुन कोल्हापुरात आणून सर्वांसमोर माफी मागायला लावेन'; धनंजय पोवार असं का म्हणाला?

2026-10-01 12:17:26

Dhananjay powar : '...तर तिच्या कानाला धरुन कोल्हापुरात आणून सर्वांसमोर माफी मागायला लावेन'; धनंजय पोवार असं का म्हणाला?

Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरने चक्क बिस्लेरीच्या पाण्याने केली अंघोळ; सांगितला भन्नाट किस्सा

2026-09-26 11:55:11

Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरने चक्क बिस्लेरीच्या पाण्याने केली अंघोळ; सांगितला भन्नाट किस्सा

Kolhapur : ढोल-ताशांचा गजर अन् ‘बाप्पा मोरया’चा जयघोष; कोल्हापूरातील मानाचा गणपती दिमाखात मार्गस्थ

2026-09-25 15:10:44

Kolhapur : ढोल-ताशांचा गजर अन् ‘बाप्पा मोरया’चा जयघोष; कोल्हापूरातील मानाचा गणपती दिमाखात मार्गस्थ

Gokul election : 'गोकुळ' निवडणुकीत भाजपचा मोठा डाव; 25 जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करणार

2026-09-21 22:32:20

Gokul election : 'गोकुळ' निवडणुकीत भाजपचा मोठा डाव; 25 जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करणार