दिवाळीनिमित्त महाराष्ट्रातील ‘ही’ दोन मंदिरं खुली करण्यास हायकोर्टाची परवानगी
Updated On:

मुंबई – 13 ते 17 नोव्हेंबरपर्यंत कोरोनाबाबतच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करत मुंबईतील दादर आणि भायखळा येथील दोन जैन मंदिरं खुली करून भाविकांना दर्शन घेण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे.
धनत्रयोदशी ते भाऊबीज दरम्यान पाच दिवसांसाठी हे मंदिर खुलं असणार आहे.
‘श्री आत्मकला लब्दी सुरीश्वरजी ग्यान जैन मंदिर’ आणि ‘शेठ मातोशा धार्मिक धर्मादाय संस्था’ या दोन जैन मंदिरांच्या विश्वस्तांनी हायकोर्टामध्ये पाच दिवस मंदिरं खुली करण्याबाबत याचिका दाखल केली होती.
त्यानुसार धनत्रयोदशी ते भाऊबीज या पाच दिवसांसाठी कडक नियमावलीसह दोन मंदिरं खुली करून भाविकांना दर्शन घेण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.





