Pune Crime : समर्थ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाची दुहेरी कामगिरी

पुणे – समर्थ पोलीस ठाण्याच्या पथकाने बनावट आधार कार्ड बनविणाऱ्या सराईत गुन्हेगारास जेरबंद केले. तसेच दुसऱ्या एका कारवाईत मोबाईल चोरालाही अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, दि. 20 ऑगस्ट रोजी समर्थ पोलीस ठाणेकडील तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दाखल गुन्हयातील आरोपीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व पांढऱ्या रंगाची ऍक्टीवा गाडीच्या आरटीओ नंबरच्या आधारे त्याचे रहाते घरातून ताब्यात घेतले.
विनायक राजू पूजारी (19, रा. स.नं. , डोबर वाडी, घोरपडीगांव ) असे त्याचे नाव आहे. त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता त्याने दि.19 ऑगस्ट रोजी दारुवाला पुल चौक येथे गर्दीचा फायदा घेवुन त्यांचे शर्टचे खिशातील मोबाईल फोन चोरी केले बाबत सांगीतले.
सदरचा मोबाईल व ऍक्टीवा गाडी गुन्हयाचे पुरावे कामी जप्त करण्यात आली आहे. तर दुसऱ्या एका प्रकरणात समर्थ पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हयात एक वर्षापासून पाहिजे असलेला आरोपी रणजित बबन खेडेकर (35, रा. खेडेकर मळा, ऊरुळी कांचन पुणे) यास अटक केली आहे.
तो बनावट आधार कार्ड अगदी सहजरीत्या बनवून देतो व सदरच्या गुन्हयामध्ये बनावट आधार कार्डचा वापर झालेला असून ते बनावट आधार कार्ड रणजित खेडेकर यानेच बनवून दिले आहे. सदरचा पाहिजे आरोपी हा मागील एक वर्षापासून पोलीसांना गुंगारा देत होता व पत्ता बदली करून रहात असलेने मिळून येत नव्हता.
सदरची कामगिरी ही उपायुक्त नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम, यांचे मार्गदर्शनानुसार सहायक पोलीस निरीक्षक, संदीप जोरे, सहायक उपनिरीक्षक सतिश भालेराव, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संतोष काळे, सुभाष पिंगळे, हेमंत पेरणे, सुमित खुट्टे, सुभाष मोरे, निलेश साबळे, विठ्ठल चोरमले, महेश जाधव, रिकी भिसे यांनी केली आहे.





