पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील ‘रोड-शो’ला नागरिकांची मोठी गर्दी, अडीच किमी चालली रॅली, पहा व्हिडीओ

PM Modi Road Show In Mumbai – आज बुधवारी (दि. 15 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत भव्य ‘रोड शो’ झाला. अशोक सिल्क मिल परिसराहून मोदींचा रोड-शो पुढे सरकत अडीच किलोमीटर पर्यंत चालला. मोदींच्या रोड-शोला रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी जमली होती. कोळी समाजातील महिलांनी पारंपारिक नृत्य करत मोदींचे स्वागत केले. मोदींनी सर्व नागरिकांना हात करून अभिवादन केले. यावेळी मोदींसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील ओपन जीपमध्ये होते.
#WATCH | Prime Minister Narendra Modi’s roadshow underway in Mumbai’s Ghatkopar area.
Maharashtra CM Eknath Shinde, Deputy CM Devendra Fadnavis are also present.#LokSabhaElections2024 pic.twitter.com/IVF2UhN13o
— ANI (@ANI) May 15, 2024
तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी महाराष्ट्रातील दिंडोरी येथे जाहीर सभा झाली. ते म्हणाले- आज मोदी गरिबांना कायमस्वरूपी घरे, वीज कनेक्शन, प्रत्येक घरात पाणी, उज्ज्वला गॅस कनेक्शन देत आहेत. आम्ही कोणाचा धर्म पाहिला नाही. प्रत्येकासाठी योजना तयार केल्या, प्रत्येकाला योजनांचा लाभ दिला. काँग्रेसला वाटते की, देशातील सरकारांनी बनवलेल्या अर्थसंकल्पातील 15% अल्पसंख्याकांवरच खर्च केला पाहिजे, म्हणजेच अर्थसंकल्प धर्माच्या आधारावर विभागला गेला पाहिजे. त्यांनी धर्माच्या आधारे देशाची फाळणी केली आणि आजही ते धर्माच्या आधारावर विविध प्रकारची फाळणी करत आहेत.
उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ज्या दिवशी शिवसेना काँग्रेसच्या वाटेवर चालायला सुरुवात करेल, त्या दिवशी त्यांची शिवसेना संपुष्टात येईल, असा विश्वास बाळासाहेबांना होता. आज जो विध्वंस होत आहे त्याचे सर्वात जास्त दुःख बाळासाहेबांना झाले असावे. अयोध्येत राम मंदिर बांधण्याचे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण झाले आहे, मात्र यावरून बनावट शिवसेना सर्वाधिक चिडत आहे. काँग्रेसने अभिषेकचे निमंत्रण नाकारले. बनावट शिवसेनेनेही तोच मार्ग निवडला.
काँग्रेसचे लोक मंदिराबाबत बकवास बोलत आहेत. बनावट शिवसेना पूर्णपणे गप्प आहे. त्यांची भागीदारी ही पापातील भागीदारी आहे आणि त्यांचे पाप सर्व जगाने पाहण्यासाठी उघड केले आहे. निवडणुकीच्या चार टप्प्यात जनतेने त्यांचा चारही बाजूंनी पराभव केला आहे.





