PM Modi Name In Epstein Files : ‘एपस्टीन फाइल्स’मध्ये पीएम मोदींचे नाव; परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळले सर्व आरोप, काय आहे प्रकरण जाणून घ्या…
PM Modi Name In Epstein Files: कुप्रसिद्ध लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईन याच्या फाईल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव असल्याचा दावा काँग्रेस नेते पवन खेरा यांनी केल्यानंतर देशात मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आहे.

PM Modi Name In Epstein Files : कुप्रसिद्ध लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईन याच्या फाईल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव असल्याचा दावा काँग्रेस नेते पवन खेरा यांनी केल्यानंतर देशात मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) अधिकृत स्पष्टीकरण जारी केले असून, हे सर्व आरोप ‘तथ्यहीन’ आणि ‘एका गुन्हेगाराचे वैयक्तिक तर्क’ असल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत.
नेमका वाद काय?
काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी अमेरिकेच्या न्याय विभागाच्या (Justice Department) एका लिंकचा हवाला देत खळबळजनक दावा केला. “जेफ्री एपस्टाईन याने आपल्या लिखाणात पंतप्रधान मोदींचा उल्लेख केला आहे. मोदींनी एपस्टाईनचा सल्ला घेतला होता आणि इस्रायल दौऱ्यादरम्यान अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी त्यांनी नृत्य व गायन केले होते,” असा दावा खेरा यांनी केला. ही बाब देशाच्या सन्मानासाठी खेदजनक असल्याचेही त्यांनी म्हटले.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रत्युत्तर
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हे आरोप फेटाळून लावत सांगितले की, “पंतप्रधान मोदींचा २०१७ चा इस्रायल दौरा हे एकमेव सत्य आहे. उर्वरित सर्व दावे ‘एका दोषी गुन्हेगाराचे निरर्थक विचार’ आहेत आणि ते सरळपणे फेटाळून लावण्यास पात्र आहेत.” यात कोणतेही तथ्य नसून देशाच्या प्रतिमेला धक्का लावण्याचा हा प्रयत्न असल्याचे मंत्रालयाने सूचित केले आहे.

यह पूरे राष्ट्र के लिए शर्म की बात है कि जेफरी एप्स्टीन – अमेरिका का एक सजायाफ्ता मानव तस्कर, बाल यौन अपराधी और सीरियल बलात्कारी – ने लिखा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने उसकी “सलाह ली और इजरायल में अमेरिकी राष्ट्रपति के लाभ के लिए नाचे-गाए। वे कुछ हफ्ते पहले मिले थे। IT… pic.twitter.com/OwHuTmlf9g
— Pawan Khera 🇮🇳 (@Pawankhera) January 31, 2026
३० लाख पाने, १.८ लाख छायाचित्रे आणि २,००० व्हिडिओ –
दरम्यान, जगभरात चर्चेत असलेल्या आणि वादग्रस्त ठरलेल्या जेफ्री एपस्टीन प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांचा नवा संच शुक्रवारी (३० जानेवारी २०२६) उघड करण्यात आला. या नवीन फाईल्समध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि प्रसिद्ध उद्योगपती रिचर्ड ब्रॅन्सन यांच्यासह अनेक जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावांचाही उल्लेख असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, यापैकी कोणावरही थेट गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप सिद्ध झालेले नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
जगभरात चर्चेत राहिलेल्या लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन प्रकरणातील लाखो कागदपत्रे अखेर अमेरिकेच्या न्याय विभागाने (DOJ) सार्वजनिक केली आहेत. यामध्ये तब्बल ३० लाख पाने, १.८ लाख छायाचित्रे आणि २,००० व्हिडिओंचा समावेश आहे. या दस्तऐवजांमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, अब्जाधीश एलॉन मस्क, बिल गेट्स आणि ब्रिटनच्या राजघराण्यातील सदस्यांच्या एपस्टीनशी असलेल्या संबंधांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
कोण होता जेफ्री एपस्टाईन?
जेफ्री एपस्टाईन हा न्यूयॉर्कमधील एक अब्जाधीश फायनान्सर होता, ज्याचे जगातील अनेक बड्या नेत्यांशी आणि सेलिब्रिटींशी संबंध होते. २००५ मध्ये त्याच्यावर एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप झाला होता. २००८ मध्ये त्याला १३ महिन्यांची शिक्षा झाली होती. २०१९ मध्ये मानवी तस्करीच्या (Sex Trafficking) आरोपाखाली त्याला पुन्हा अटक करण्यात आली, मात्र खटला सुरू असतानाच १० ऑगस्ट २०१९ रोजी तुरुंगात त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. अधिकृतपणे ही आत्महत्या असल्याचे सांगितले जात असले तरी, त्याच्या मृत्यूबाबत आजही अनेक गूढ कायम आहेत.
हेही वाचा – Gold Silver Rates: चांदी एकाच दिवसात 1,28,000 रुपयांनी का घसरली? जाणून घ्या नेमकं कारण






