Petrol-Diesel Price Today : अवघ्या पाच दिवसांत तिसऱ्यांदा पेट्रोल, डिझेल दर वाढले
Updated On:

नवी दिल्ली – सार्वजनिक इंधन कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत लिटरमागे प्रत्येकी 25 पैशांची वाढ केली. त्यामुळे अवघ्या पाच दिवसांत तिसऱ्यांदा ती इंधने महागली. नव्या दरवाढीमुळे दिल्लीत पेट्रोल 85 रूपये 45 पैशांवर, तर मुंबईत 92 रूपये 04 पैशांवर पोहचले.
दिल्लीत डिझेलचा दर 75.63 रूपये, तर मुंबईत 82.40 रूपये इतका झाला आहे. दोन्ही शहरांत डिझेल दराने नवा उच्चांक गाठला आहे. जवळपास महिनाभराच्या विश्रांतीनंतर सार्वजनिक कंपन्यांनी 6 जानेवारीपासून पेट्रोल आणि डिझेल दरांचा दैनंदिन आढावा घेण्यास प्रारंभ केला.
तेव्हापासून पंधरवड्यात अनेकदा दोन्ही इंधनांच्या किमती वाढवण्यात आल्या. त्यामुळे संबंधित कालावधीत पेट्रोल 1 रूपया 74 पैशांनी, तर डिझेल 1 रूपया 76 पैशांनी महागले आहे.





