“पाकिस्तान दिवाळखोर झालाय”

कराची – पाकिस्तान दिवाळखोर झाला आहे, असा दावा फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यूचे माजी अध्यक्ष झैदी यांनी केला आहे. मात्र पाकिस्तानची चांगले काम करत असून परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचा दावा पाकिस्तान सरकारकडून करण्यात येत आहे.
हमदर्द विद्यापीठात एका चर्चासत्राला संबोधित करताना ते बोलत होते.
याप्रसंगी शब्बर झैदी यांनी सरकारचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. पाकिस्तानच्या फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यूचे माजी अध्यक्ष शब्बर झैदी म्हणाले, ”आपला देश दिवाळखोर झाला आहे आणि भ्रमात जगण्यापेक्षा वास्तव ओळखणे चांगले आहे. ते म्हणाले की, सरकारमधील प्रत्येकजण सर्व काही ठीक आहे असे म्हणत आहे, तर त्यांच्या मते पाकिस्तान सध्या दिवाळखोर आहे.
झैदी म्हणाले की त्यांचा विश्वास आहे की, ‘या क्षणी देश दिवाळखोर आहे. उपाय शोधण्यापेक्षा देशाची अर्थव्यवस्था दिवाळखोर झाली आहे हे स्वीकारणे चांगले आहे. देशाचे भले होत असल्याचा दावा करुन जनतेची फसवणूक करण्यापेक्षा त्यावर उपाय शोधून देशाला दिवाळखोर समजणे योग्य ठरेल, असे ते म्हणाले.
दरम्यान, त्यांच्या वादग्रस्त विधानानंतर झैदी यांनी स्पष्टीकरण देण्यासाठी ट्विट केले की त्यांचे शब्द संदर्भासह पाहिले गेले नाहीत आणि चुकीचे वर्णन केले गेले. दिवाळखोरी आणि चिंतेचे मुद्दे असल्याचे त्यांनी सांगितले.





