नवी दिल्ली- देशात दिवसेंदिवस रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत असून दररोज शेकडो लोकांचा बळी जात आहे. यामध्ये हेल्मेट न घातल्याने मृत्यू होण्याचे अधिक प्रमाण आहे. अनेक तर जण फक्त पोलिसांपासून वाचण्यासाठीच हेल्मेटचा वापर करत असतात. त्यामुळे हेल्मेट वापरण्याचे फायदे आणि खरेदी करताना योग्य हेल्मेट कसे ओळखावे याबाबतची माहिती जाणून घेऊया
हेल्मेट का वापरावे ? –
अनेकदा लोक हेल्मेट घालणे टाळत असतात कारण त्यांना वाटते की हेल्मेट घातल्याने मी चांगला दिसणार नाही. परंतु हेच हेल्मेट न वापरणे आपल्या जीवावर देखील बेतू शकते. मानवी शरीराचा सर्वात संवेदनशील भाग म्हणून मेंदूची ओळख आहे. व्यक्तीचा जेव्हा अपघात होतो तेव्हा त्याच्या सर्वप्रथम डोक्याला मार लागतो. त्यामुळे प्रवासादरम्यान हेल्मेट चा वापर करणे अतिशय आवश्यक ठरते.
योग्य हेल्मेट कसे निवडावे?
1. हेल्मेट खरेदी करण्यापूर्वी हेल्मेटवर ISI प्रमाण चिन्ह आहे कि नाही याची खात्री करा. मगच हेल्मेट खरेदी करा. ISI मार्क हे BIS द्वारे प्रमाणित केले जाते, ज्याला ‘ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स’ असेही म्हणतात
2. काळ्या रंगाचे व्हिझर असलेले हेल्मेट खरेदी करू नये. काळ्या रंगाच्या व्हिझरने रात्री बाईक चालवणाऱ्या व्यक्तीला त्रास होतो.
3. पोलिसांपासून वाचण्यासाठी अनेक जण रस्त्याच्या कडेला हेल्मेट विकत घेत असतात. परंतु घाईगरबडीमध्ये खरेदी केलेले हेल्मेट आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते म्हणून चांगल्या दुकानातून हेल्मेट खरेदी करावे.