Mumbai-Pune Expressway Traffic: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कधी सुरळीत होणार? मोठी अपडेट
Mumbai-Pune Expressway Traffic

Mumbai-Pune Expressway Traffic: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर उलटल्याने गेल्या २७ तासांपासून वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. कालपासून हजारो प्रवासी महामार्गावर अडकून पडले असून, परिस्थिती अद्यापही ‘जैसे थे’ आहे. गॅस रिकामी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी, आज मध्यरात्री १२ वाजेपर्यंत वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता धूसर आहे.
नेमकी घटना काय?
कोचीहून गुजरातच्या दिशेने २० टन प्रोपोलिन गॅस घेऊन जाणारा टँकर आडोशी बोगद्याजवळ उलटला. टँकरमधील गॅस अत्यंत ज्वलनशील असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक तत्काळ थांबवण्यात आली. गॅस गळतीचा धोका टाळण्यासाठी अग्निशमन दलाकडून टँकरवर सतत पाण्याचा मारा केला जात आहे.
महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त टँकरमधील गॅस इतर चार छोट्या टँकरमध्ये भरण्याचे काम सुरू आहे. दोन टँकरमध्ये गॅस यशस्वीरीत्या भरण्यात आला आहे. उर्वरित दोन टँकर भरल्यानंतर क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त टँकर बाजूला केला जाईल. या संपूर्ण प्रक्रियेसाठी अजून किमान ४ तासांचा अवधी लागणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
NCP Merger: राष्ट्रवादी विलिनीकरणाचा मुद्दा! शिवसेना नेते का घेताहेत शरद पवारांची बाजू?
प्रवाशांचा जीव टांगणीला; एसटीच्या फेऱ्या रद्द –
या महाकोंडीचा सर्वाधिक फटका पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना आणि रुग्णांना बसला आहे. अनेक प्रवाशांच्या विमानांच्या वेळा चुकल्या असून, अत्यावश्यक कामासाठी निघालेले नागरिक रस्त्यावरच अडकले आहेत.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन एसटी प्रशासनाने पुण्यातून मुंबईकडे (दादर, ठाणे, बोरीवली, मुंबई सेंट्रल) जाणाऱ्या सर्व बस फेऱ्या तूर्तास रद्द केल्या आहेत. जोपर्यंत रस्ता पूर्णपणे मोकळा होत नाही, तोपर्यंत बसेस सोडल्या जाणार नाहीत.
जर तुम्ही पुण्याहून मुंबईकडे निघाला असाल, तर सध्यातरी प्रवास टाळणे हिताचे ठरेल. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरही (Old Highway) प्रचंड ताण आल्याने तेथेही संथ गतीने वाहतूक सुरू आहे.
Aadhaar Card Cancelled: UIDAI ने 2.5 कोटी आधार कार्ड केले कायमचे बंद





