Aadhaar Card Cancelled: भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आधार डेटाबेसची अचूकता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. देशभरात राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत आतापर्यंत २.५ कोटींहून अधिक मृत व्यक्तींचे आधार क्रमांक बंद करण्यात आले आहेत. आधार ही जगातील सर्वात मोठी बायोमेट्रिक ओळख प्रणाली असून, सध्या देशात सुमारे १३४ कोटी सक्रिय आधारधारक आहेत. मात्र, मृत व्यक्तींच्या आधार क्रमांकाचा गैरवापर रोखण्यासाठी ही स्वच्छता मोहीम अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर तिचा आधार क्रमांक निष्क्रिय करणे तांत्रिक आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असते. यामुळे ओळखीची चोरी आणि सरकारी कल्याणकारी योजनांच्या लाभांचा होणारा अनधिकृत वापर थांबवता येतो. फसवणूक रोखण्यासाठी कडक पावले – इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने यासंदर्भात स्पष्ट केले आहे की, अनेकदा आधार कार्डावर असलेला पत्ता आणि मृत्यूची नोंद झालेले ठिकाण वेगळे असू शकते, त्यामुळे डेटाबेस अद्ययावत ठेवण्याचे मोठे आव्हान प्राधिकरणासमोर होते. ओळखीशी संबंधित फसवणूक रोखण्यासाठी प्राधिकरणाने अनेक कडक पावले उचलली आहेत. यामध्ये बायोमेट्रिक आणि आधार लॉक-अनलॉक करण्याची सुविधा, थेट उपस्थिती तपासण्यासाठी फेस ऑथेंटिकेशन आणि ऑफलाइन पडताळणीसाठी क्यआर कोडचा समावेश आहे. Todays Top 10 News: अजितदादांच्या अपघाताबाबत आमदार मिटकरींचा नवा खळबळजनक दावा ते सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी… वाचा टाॅप बातम्या बायोमेट्रिक डेटा कोणाशीही शेअर नाही – महत्त्वाचे म्हणजे, UIDAI कोणत्याही परिस्थितीत आधारधारकांचा बायोमेट्रिक डेटा कोणाशीही शेअर करत नाही. हा सर्व डेटा सुरक्षित ‘डेटा वॉल्ट’मध्ये एन्क्रिप्टेड स्वरूपात साठवला जातो. तसेच, आधारमधील माहिती बदलण्यासाठी केवळ अधिकृत कागदपत्रांचाच आधार घेतला जातो, जेणेकरून प्रक्रियेत पारदर्शकता राहील. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातच सुमारे २ कोटी आधार क्रमांक बंद करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती. यासाठी प्राधिकरणाने भारताचे रजिस्ट्रार जनरल, राज्य सरकारांच्या संस्था, सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) आणि राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाच्या डेटाची मदत घेतली आहे. भविष्यात बँका आणि इतर वित्तीय संस्थांकडील मृत्यूच्या नोंदींचा वापर करून ही प्रक्रिया अधिक वेगवान करण्याचे नियोजन आहे. एकदा दिलेला आधार क्रमांक दुसऱ्या कोणालाही पुन्हा दिला जात नाही, मात्र गैरवापर टाळण्यासाठी तो वेळेत बंद करणे हेच प्राधिकरणाचे मुख्य उद्दिष्ट आहे. मणिपूरची राष्ट्रपती राजवट संपुष्टात ! वाय. खेमचंद सिंह यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ