“त्या’ मतदारांना फोन-पेवर पैसे पाठवा; आमदार संतोष बांगर काय म्हणाले? निवडणुक आयोग कारवाई करणार?

हिंगोली : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. इच्छुक आमदार कामाला लागले आहेत. दुसरीकडे सर्व पक्षांची उमेदवारांची यादीही अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. जागावाटप आणि उमेदवारांची नावे जाहीर झाली नसली तरीही अनेक ठिकाणी विद्यमान आमदारांना आपल्यालाच पुन्हा तिकीट मिळणार अशी खात्री वाटत आहे. त्यामुळे त्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. (Kalmanuri Assembly Constituency)
आमदार संतोष बांगर यांच्या वक्तव्याने खळबळ –
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी एका कार्यक्रमात केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे. त्यांनी बाहेर राहणाऱ्या मतदारांना फोन-पे वर पैसे पाठवा असे वक्तव्य त्यांनी केले आहे. बाहेरगावी असलेल्या कार्यकर्त्यांची लिस्ट दोन-तीन दिवसांमध्ये द्यावी. त्यांना सांगा गाड्या करा, गाड्यांसाठी जे काही लागतं ते त्यांना फोन पे करा, त्यांना सांगा येण्या-जाण्याचे जे काही लागते ते आम्हाला सांगा, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केल्यानं खळबळ उडाली आहे.
निवडणूक आयोग कार्यवाही करणार?
मतदारांना पैशाचे अमिष दाखवून मतदानाला आणण्याची भाषा केल्याने निवडणूक आयोग आता यावर काय कार्यवाही करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तिकीट मिळण्याचा विश्वास, अर्ज दाखल करण्याची तारीख फिक्स –
उमेदवारी जाहीर होण्याअगोदरच आमदार संतोष बागर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख फिक्स करण्यात आली आहे. येत्या 24 तारखेला आमदार संतोष बांगर कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. संतोष बांगर हे सध्या शिवसेना शिंदे गटात आहेत. शिवसेनेते फूट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला होता. ते सातत्यानं त्यांच्या वेगवेगळ्या वक्त्व्यांमुळं चर्चेत असतात. अशातच आता त्यांनी बाहेरगावच्या मतदारांना आणण्यासाठी फोन पे करण्याची भषा केली आहे. त्यामुळं सर्वत्र त्यांच्या या वक्तव्याची चर्चा होत आहे. मतदारांना अमिष दाखवण्याचा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.
कळमनुरी मतदारसंघ 2019 निवडणुक निकाल –
कळमनुरी विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर येथे संतोष बांगर यांना 82515 मते मिळाली होती. त्यांनी विजय मिळवला होता. तर दुसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अजित मगर यांना 66137 मते मिळाली होती. तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे संतोष तरफे यांना 57544 मते मिळाली होती.




