कार्यकर्ता पाया पडून उठताच आमदाराने कानशिलात लगावली; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Updated On:

सोलापूर – सोलापूरातील बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी कार्यकर्त्याने पाया पडल्यानंतर त्याच्या कानशिलात लगावली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
बार्शीत एका क्रिकेट सामन्याच्या कार्यक्रमावेळी आमदार राजेंद्र राऊत यांच्या पाया पडण्यासाठी एक कार्यकर्ता स्टेजवर आला होता. त्याने आमदारांच्या चरणावर मस्तक टेकवले. मात्र, तो जसा पाया पडून वर उठला तशी आमदारांनी त्याच्या कानशिलात लगावली.
दरम्यान, हा कार्यकर्ता त्या भागातील खडी क्रशरवर कामाला असून तो दारू पिऊन आल्याने आमदारांनी त्याच्या कानाखाली लगवल्याची माहिती समोर आली आहे.





