मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; उपोषणाचा आज तिसरा दिवस

जालना – मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषण सुरु केले आहे. आज जरांगे यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे.
जरांगे यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी वैद्यकीय पथक आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी जरांगे यांच्या आरोग्याची तपासणी केली. मराठा समाजाला सगेसोयऱ्यांच्या माध्यमातून ओबीसीमध्येच आरक्षण द्यावी, या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत.
सगेसोयरेच्या मागणीसाठी जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून यात जरांगे यांची प्रकृती हळू हळू खालावत असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोग्य अधिकाऱ्यांकडून त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे.
दरम्यान, 7 ऑगस्टपासून पश्चिम महाराष्ट्र दौरा करणार असल्याची घोषणा देखील मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे. यामध्ये ते नाशिक, सोलापूर येथेही शांतता रॅली काढणार आहेत.





