राज्यात 3 हजार 314 नवे करोनाबाधित; जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई – आज दिवसभरात 3 हजार 314 नवे करोनाबाधित आढळले असून, 66 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा करोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे.
दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे, दिवसभरात 2 हजार 124 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता 19 लाख 19 हजार 550 वर पोहचली आहे. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण रिकव्हरी रेट 94.29 टक्के आहे.
सध्या राज्यात 59 हजार 214 ऍक्टिव्ह केसेस असून, आतापर्यंत 18 लाख 9 हजार 948 जण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,25,2,554 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 19 लाख 19 हजार 550 (15.35 टक्के)नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 57 हजार 385 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर 3 हजार 323 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
दरम्यान, कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत 25 नोव्हेंबरनंतर ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांची पालिकेने करोना चाचणी सुरू केली आहे. त्यात एक प्रवासी करोनाबाधित आढळून आला आहे. या प्रवाशाचा तपासणी अहवाल जनुकीय रचनेच्या तपासणीसाठी मुंबईतून पुणे येथील राष्ट्रीय संसर्गजन्य संस्थेकडे पाठविण्यात आला आहे. या प्रवाशाची प्रकृती स्थिर आहे, असे पालिका प्रशासनाने सांगितले.





