महापुरामुळे इंद्रायणी नदी जलपर्णीमुक्त ; केटी बंधाऱ्यावरून वाहिले पाणी
Updated On:

चिंबळी – आठवडाभरापासून पाणलोट क्षेत्रात सततच्या मुसळधार पावसाने इंद्रायणी नदीची पाणी पातळी वाढली. तसेच वडिवळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु केल्याने इंद्रायणीला महापूर आला. मोशी- कुरूळी हद्दीतील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या जुन्या पुलावरून तसेच मोशी-चिंबळी हद्दीत असलेल्या केटी बंधाऱ्यावरून पाणी वाहत आहे. या महापुरात इंद्रायणी नदी पात्रातील पूर्ण जलपर्णी वाहून गेली आहे. इंद्रायणी नदी जलपर्णीमुक्त झाली आहे.
शेतातील सर्व भागात पाणी साचले आहे. रखडेल्या भात लावणीला वेग येणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या महापुरात चिंबळी -मोशी हद्दीत असलेल्या के टी बंधाऱ्याजवळील भराव वाहून गेला असून काही ठिकाणी स्मशानभूमीत पाणी शिरल्याची स्थिती आहे. काही शेतकऱ्यांच्या विद्युत पंप मोटारी पाण्यात बुडाल्या आहेत.





