\n

सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी –   (INDIA Bloc Meeting)

\n

देशातील सध्याची आर्थिक परिस्थिती, वाढती बेरोजगारी, महागाई, शेतकरी आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणीही इंडिया आघाडीने केली आहे.

\n

याशिवाय आघाडीतील समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी दर दोन महिन्यांनी बैठक घेण्याचा निर्णय झाला असून संसदेच्या अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात नियमित समन्वय बैठका घेण्यात येणार आहेत.

\n

हेही वाचा –  मोठी बातमी ! 20 खासदार फुटले; लोकसभा अध्यक्षांना पत्र देऊन एनडीएत जाण्याची व्यक्त केली इच्छा 

\n

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी बैठकीनंतर सांगितले की, पाच प्रमुख मुद्द्यांवर सर्व पक्षांमध्ये एकमत झाले असून हे प्रश्न संयुक्तपणे संसदेत आणि जनतेसमोर मांडले जातील. त्यांनी यावेळी निवडणूक प्रक्रियेबाबतही त्यांनी भाजपवर टीका केली.

\n

देशातील बडे नेते बैठकीला उपस्थित –   (INDIA Bloc Meeting)

\n
\"INDIA

INDIA Bloc Meeting : 2 वर्षांनंतर 25 विरोधी पक्ष आले एकत्र; भाजपविरोधात ‘या’ 5 मुद्द्यांवर मोठा निर्णय

\n

 

\n

दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये झालेल्या या बैठकीत काँग्रेस संसदीय दलाच्या प्रमुख सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काॅंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी सहभाग घेतला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावली, तर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेनही ऑनलाइन सहभागी झाले.

\n

DMK आणि AAP पक्ष राहिला दूर –

\n

बैठकीला जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती, भाकपचे डी. राजा, भाकपा (माले)चे दीपांकर भट्टाचार्य यांच्यासह विविध पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र द्रविड मुनेत्र कळघम (DMK) आणि आम आदमी पक्ष (AAP) या बैठकीपासून दूर राहिले. ‘आप’ने यापूर्वीच इंडिया आघाडीपासून अंतर ठेवण्याची भूमिका जाहीर केली आहे, तर काँग्रेससोबतच्या मतभेदांमुळे डीएमकेने बैठकीवर बहिष्कार टाकल्याचे सांगितले होते.

\n

तमिळगा वेत्री कळघम (TVK) या पक्षाच्या अनुपस्थितीबाबत काँग्रेस सूत्रांनी स्पष्ट केले की, बैठकीसाठी प्रामुख्याने संसदेत प्रतिनिधित्व असलेल्या पक्षांनाच निमंत्रित करण्यात आले होते. मात्र इंडिया आघाडीचा विस्तार सुरू असून लवकरच आणखी काही पक्ष या आघाडीत सहभागी होतील, असा दावा सूत्रांनी केला.

\n

पश्चिम बंगालमधील अलीकडील राजकीय घडामोडी आणि भाजपचा वाढता प्रभाव लक्षात घेता विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा एकत्र येण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले. इंडिया आघाडीची यापूर्वीची अधिकृत बैठक जून २०२४ मध्ये झाली होती.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"INDIA Bloc Meeting : 2 वर्षांनंतर 25 विरोधी पक्ष आले एकत्र; भाजपविरोधात ‘या’ 5 मुद्द्यांवर मोठा निर्णय","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/06/india-block.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/dnyaneshwarphadeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/news-about-india-bloc-meeting#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/06/india-block.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/news-about-india-bloc-meeting#webpage","name":"INDIA Bloc Meeting : 2 वर्षांनंतर 25 विरोधी पक्ष आले एकत्र; भाजपविरोधात ‘या’ 5 मुद्द्यांवर मोठा निर्णय","url":"https://www.dainikprabhat.com/news-about-india-bloc-meeting","inLanguage":"mr","description":"INDIA Bloc Meeting : पश्चिम बंगालमधील अलीकडील राजकीय घडामोडी आणि भाजपचा वाढता प्रभाव लक्षात घेता विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा एकत्र येण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले. इंडिया आघाडीची यापूर्वीची अधिकृत बैठक जून २०२४ मध्ये झाली होती.","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/news-about-india-bloc-meeting#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/06/india-block.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/news-about-india-bloc-meeting#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/news-about-india-bloc-meeting","name":"INDIA Bloc Meeting : 2 वर्षांनंतर 25 विरोधी पक्ष आले एकत्र; भाजपविरोधात ‘या’ 5 मुद्द्यांवर मोठा निर्णय"}}]}}}

INDIA Bloc Meeting : 2 वर्षांनंतर 25 विरोधी पक्ष आले एकत्र; भाजपविरोधात ‘या’ 5 मुद्द्यांवर मोठा निर्णय

INDIA Bloc Meeting : 2 वर्षांनंतर 25 विरोधी पक्ष आले एकत्र; भाजपविरोधात ‘या’ 5 मुद्द्यांवर मोठा निर्णय - Dainik Prabhat