सीपीआर कसा द्यावा? जखम झाल्यास पट्टी कशी करावी? जाणून घ्या

Updated On:

पुणे – नेहमी होणाऱ्या अपघातावेळी वैद्यकीय मदत मिळेपर्यंत त्या व्यक्तीवर प्रथमोपचार केल्यास त्याचा जीव वाचू शकतो. त्यामुळे प्रथमोपचार प्रशिक्षण घेणे आवश्‍यक असते. गंभीर अपघातात एखाद्यावेळी व्यक्तीचे हृदय देखील बंद पडते. त्यावेळी त्या व्यक्तीवर जर तत्काळ प्रथमोपचार केले, त्याला सीपीआर (Cardiopulmonary Resuscitation) दिला तर त्याचा जीव वाचू शकतो.


सीपीआर कसा द्यावा ? –

1) संबंधित व्यक्तीच्या दोन्ही खांद्यावर थाप मारून तिला उठविण्याचा प्रयत्न करा. श्वासोच्छवास चालू आहे की नाही हे पाहून त्वरित मतदीसाठी 108 क्रमांकावर फोन करून ऍम्बूलन्स बोलवा.

2)वेळ न दवडता छातीच्या हाडावर दोन्ही हातांनी दाब द्यायला सुरूवात करा. एक मिनिटात 90 वेळा चेस्ट कॉम्प्रेशन्स व 6 वेळा तोंडाने श्वास द्या. ही क्रिया ऍम्बुलन्स येईपर्यंत किंवा रुग्ण शुद्धीवर येईपर्यंत सुरू ठेवावी.

जखम झाल्यास पट्टी करण्याची पद्धत –

जखम झाल्यास प्रथम ती जागा नॉर्मल सलाईनने स्वच्छ करून घ्यावी. त्यानंतर जखमेला बिटाडाईन ने पुसून घ्यावे व त्यावर जंतूनाशक मलम लावावा. त्यावर कापूस ठेवून गॉजची छोटी गादी करून दाब देऊन गॉजने पट्टी बांधावी.

2030 पर्यंत एक लाख फर्स्ट एडर बनविणे हे आमचे ध्येय आहे.
(प्रथमोपचार प्रशिक्षक डॉ. भार्गवी विजय बडे,
विघ्नहर्ता साई हॉस्पिटल आणि प्रयोगशाळा, दिघी, पुणे)
अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्या –  https://drbadevshl.com/

आणखी संबंधित बातम्या

Blood Donation : रक्तदान कोणाला करता येते आणि काय घ्यावी काळजी? 'ही' नियमावली नक्की वाचा

2026-04-17 21:45:09

Blood Donation : रक्तदान कोणाला करता येते आणि काय घ्यावी काळजी? 'ही' नियमावली नक्की वाचा

विघ्नहर्ता साई जनसेवा प्रतिष्ठाणला प्रथमोपचार प्रशिक्षणासाठी मान्यता

2022-10-04 19:31:32

विघ्नहर्ता साई जनसेवा प्रतिष्ठाणला प्रथमोपचार प्रशिक्षणासाठी मान्यता