फॅशन स्ट्रीट मार्केटमधील स्टॉल्स हटविण्यासंदर्भात लवकरच कायदेशीर कारवाई
Updated On:

पुणे – दररोज लाखो रुपयांची उलाढाल असलेल्या लष्कर परिसरातील ‘फॅशन स्ट्रीट’ हे पुण्यातील तरुणाईची आवडीची बाजारपेठ आहे. दररोज शेकडो नागरिक याठिकाणी येऊन कपडे, जीवनोपयोगी वस्तू अशा विविध गोष्टींची खरेदी करत असतात.
मात्र, पुण्यातील लष्कर परिसरातील महत्वाची बाजारपेठ असलेले फॅशन स्ट्रीट मार्केट हे अनधिकृत मार्केट म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच मार्केटमधील स्टॉल्स हटविण्यासंदर्भात लवकरच कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.





