सलग 4 फेऱ्यांमध्ये पंकजा मुंडेंचं लीड घटलं, धाकधुक वाढली; अजून 6 फेऱ्या शिल्लक

बीड – बीड लोकसभा मतदारसंघ मतमोजणीच्या 26 फेऱ्या झाल्या आहेत. त्यांची आकडेवारी जाहीर झाली आहे. एकूण 32 मतमोजणी फेऱ्या असून अजून 6 फेऱ्या शिल्लक आहेत. बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्याशी थेट सामना आहे.
आतापर्यंतच्या मतमोजणीची आकडेवारी पाहिली तर सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये बजरंग सोनवणे आघाडीवर होते. मात्र नंतर पंकजा मुंडे यांनी आघाडी घेतली. शेवटच्या चार फेऱ्यांचा विचार केल्यास, 23 व्या फेरीमध्ये पंकजा मुंडे 34 हजार 705 मतांनी आघाडीवर होत्या. 24 व्या फेरीत 30 हजार 461, 25 व्या फेरीत 22 हजार 521 तर 26 व्या फेरीत हे लीड आघाडी 10 हजार 276 मतांपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासह कार्यकर्त्यांमध्ये धाकधुक वाढली आहे.
26 व्या फेरी अखेर कोणाला किती मतं –
पंकजा मुंडे – 6 लाख 27 हजार 350 (आघाडी)
बजरंग सोनवणे – 6 लाख 17 हजार 74
आता 6 फेऱ्या शिल्लक –
सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत 26 फेऱ्यांची आकडेवारी हाती आली होती. त्यानंतर आता पुढील 6 फेऱ्यामध्ये आष्टी, केज, गेवराई, माजलगाव, बीड या मतदासंघातील मतमोजणी होणार आहे. परळीतील मतमोजणी संपली आहे. परळी हा पंकजा मुंडेंचा बालेकिल्ला आहे. तेथिल मतदान संपले तरी म्हणावे असे लीड न मिळाल्याने आता पंकजा मुंडेंसह कार्यकर्त्यांची धाकधुक वाढली आहे.




