पुरातत्व विभागाकडून अंबाबाई मंदिराची पाहणी; देवीच्या मुर्तीबाबत दिली महत्वाची माहिती…

कोल्हापूर – साडेतीन शक्तिपीठांपैकी एक महत्वाचे पीठ असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मूर्तीची आणि संपूर्ण मंदिर परिसराची पाहणी केंद्रीय पुरातत्व विभागानं आज केली आहे. यामध्ये प्रामुख्याने अंबाबाई देवीच्या मूर्तीची पाहणीत केंद्रीय पुरातत्व विभागाचे रसायन तज्ञ श्रीकांत मिश्रा यांच्या तीन सदस्यीय पथकाने केली आहे.
या पाहणीमध्ये अंबाबाई देवीची मूर्ती अतिशय चांगल्या स्थितीमध्ये असून मूर्तीची कोणतीही झीज झाली नसल्याचं किंवा धोका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केला आहे. तसेच अंबाबाई मंदिरातील श्री महाकाली आणि श्रीमहासरस्वती मूर्ती मूर्तीची काही प्रमाणात झीज झाली असून त्यांची रासायनिक जतन प्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
मंदिरात काही प्रमाणात कार्बनचा थर असल्याचे पथकाच्या निदर्शनास आल असून मंदिराच्या टेरेस वरती मोठ्या प्रमाणात असलेल्या कोब्याचे काम करणं अवघड आणि जोखमीचे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यासाठी सखोल अभ्यास करून लवकर अंदाज पत्रक तयार करून घ्यावं अशा सूचनाही या पथकाने दिल्या आहेत.





