ठरलं तर..! ‘या’ सिनेमातून सुनील शेट्टीचा मुलगा करणार पदार्पण, 24 सप्टेंबरला होणार रिलीज

नवी दिल्ली – बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टी याची मुलगी अथिया शेट्टीने 2015 साली हिरो या चित्रपटाच्या माध्यामातून सिनेमा सृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर अथिया शेट्टीने बर्याच हिंदी चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर बर्यापैकी तिचा स्टारडम निर्माण झाला आहे.
मात्र आता तिचा भाऊ आणि सुनील शेट्टी याचा मुलगा अहान शेट्टी बॉलिवूड मध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. अहान हा तडप या सिनेमातून बॉलीवूड मध्ये प्रवेश करत आहे. त्याचबरोबर या सिनेमाची रिलीज डेट सुद्धा समोर आली आहे.
तडप या सिनेमात अहान शेट्टी सोबत प्रमुख भूमिकेत तारा सुतारीया स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तडप हा सिनेमा 24 सप्टेंबर 2021 या दिवशी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
तडप या सिनेमाबद्दल स्वता अभिनेता अहान शेट्टीने सांगताना सोशल मीडियावर या सिनेमाचा पोस्टर शेअर केला. प्रदर्शनाची तारीख सांगताना हा अभिनेता म्हणाला, “प्यार की तड़प अब अंजाम तक ले जाएगी।’ हा सिनेमा लव्हस्टोरीवर आहे.
या सिनेमातून बॉलीवूड मध्ये पदार्पण करणार्या अहान शेट्टीला शुभेच्छा देताना तडप या सिनेमाचा पोस्टर शेअर करत कॅप्शन मध्ये लिहले, ” तुम्हारे लिए बहुत बड़ा दिन है अहान। मुझे आज भी याद है, तुम्हारे पापा सुनील शेट्टी की पहली फिल्म बलवान का पोस्टर और आज तुम्हारी फिल्म का पोस्टर प्रस्तुत कर रहा हूं। फिल्म तड़प का पोस्टर शेयर करके बहुत खुशी और गर्व महसूस हो रहा है। फिल्म 24 सितंबर को मल्टीप्लेक्स में रिलीज होगी।”
View this post on Instagram
या सिनेमाचे दिग्दर्शन मिलन लूथरिया करत आहेत. हा सिनेमा 2018 साली प्रदर्शित झालेल्या तेलगू सिनेमा RX100 चा रिमेक आहे. RX100 हा सिनेमा 2018 साली सुपरहिट ठरला होता. त्यामुळे आता RX100 प्रमाणे तडप हा देखील ब्लॉकबस्टर सिनेमा ठरेल अशी अपेक्षा आहे. अहान शेट्टी बद्दल बोलायचे झाले तर हा त्याचा पहिलाच सिनेमा आहे. यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यामुळे आता हे बघणे औत्सुक्याचे ठरेल की, तो आपल्या वडिलां प्रमाणे बॉलीवूड मध्ये आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकेल की नाही. हे येणार काळच सांगेल.





