MLC Election : मोठी बातमी..! नवनिर्वाचित शिक्षक मतदारसंघातील आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश; राज्यात खळबळ
MLC Election : बिहार विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (NDA) मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे.

MLC Election : बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. विधान परिषद निवडणुकीत विजय मिळवलेल्या दोन नवनिर्वाचित आमदारांनी आमदारकीची शपथ घेण्यापूर्वीच भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही आमदारांनी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या जनता दल युनायटेडच्या (JDU) उमेदवारांचा पराभव केला होता. (MLC Election)
आता या पक्षप्रवेशामुळे भाजपचं विधान परिषदेत संख्याबळ वाढणार असून, JDU साठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. या घडामोडीमुळे बिहारच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं आहे. (MLC Election)
भाजपने बिहारमध्ये फिरवला राजकीय गेम!
महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या चार प्रमुख राज्यांमध्ये शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुका पार पडल्या. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांचा समावेश होता. (MLC Election)
या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. पाचपैकी दोन जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले, तर तीन जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली. (MLC Election)
मराठवाडा, पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघांत महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले, तर पुणे शिक्षक आणि अमरावती शिक्षक मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. (MLC Election)
मात्र, बिहारमधून आता भाजपसाठी मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. विधान परिषद निवडणुकीत अपक्ष म्हणून विजयी झालेले दोन आमदार भाजपात दाखल झाले आहेत. (MLC Election)
शपथ घेण्यापूर्वीच दोन आमदार भाजपात दाखल
बिहार विधान परिषद निवडणुकीत अपक्ष म्हणून विजय मिळवलेल्या बंशीधर ब्रजवासी आणि राहुल राज यांनी भाजपात प्रवेश केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय सरावगी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. (MLC Election)
विशेष म्हणजे, या दोन्ही आमदारांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेण्यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे भाजपचं विधान परिषदेत संख्याबळ वाढणार असून, विरोधकांसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. (MLC Election)
JDU च्या उमेदवारांना पराभूत करून मिळवला होता विजय
या पक्षप्रवेशामागील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, भाजपमध्ये दाखल झालेल्या या दोन्ही आमदारांनी निवडणुकीत भाजपचा मित्रपक्ष असलेल्या JDU च्या उमेदवारांचा पराभव केला होता. (MLC Election)
राहुल राज : सारण शिक्षक मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत JDU चे उमेदवार आनंद पुष्कर यांचा पराभव केला.
बंशीधर ब्रजवासी : तिरहुत पदवीधर मतदारसंघातून JDU चे उमेदवार अभिषेक झा यांना पराभूत करत विजय मिळवला. (MLC Election)
आता हे दोन्ही विजयी आमदार भाजपमध्ये दाखल झाल्याने बिहारमधील सत्ताधारी आघाडीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (MLC Election)
RJD चा भाजपवर हल्लाबोल; पक्षप्रवेशावरून वाद
या पक्षप्रवेशावरून बिहारमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राष्ट्रीय जनता दलाने (RJD) भाजपवर जोरदार टीका केली आहे. RJD चे प्रवक्ते शक्ती सिंह यादव यांनी या पक्षप्रवेशावर आक्षेप घेतला असून, अशा प्रकारचा पक्षप्रवेश असंवैधानिक असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, या पक्षप्रवेशामुळे भाजपचं संख्याबळ वाढणार असलं, तरी भाजपचा मित्रपक्ष JDU याच्यासाठी ही घडामोड महत्त्वाची मानली जात आहे. (MLC Election)
बिहारच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा
विधान परिषद निवडणुकीत JDU च्या उमेदवारांना पराभूत करणारे दोन अपक्ष आमदार आता भाजपमध्ये दाखल झाल्याने बिहारच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. (MLC Election)
चार राज्यांतील २८ जागांसाठी झालेल्या विधान परिषद निवडणुकांनंतर बिहारमध्ये ही मोठी राजकीय घडामोड घडली आहे. भाजपने दोन नवनिर्वाचित आमदारांना पक्षात घेतल्याने विरोधकांसह मित्रपक्ष JDU च्या राजकीय भूमिकेकडेही लक्ष लागले आहे. (MLC Election)

