आव्हाळवाडीच्या नवनिर्वाचित उपसरपंच मंदाताई सातव यांचा सत्कार
Updated On:

वाघोली – आव्हाळवाडी (ता. हवेली) गावच्या उपसरपंचपदी मंदाताई अशोक सातव यांची निवड करण्यात आली. सातव यांची उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सदस्य गणेश बापू कुटे, पंचायत समितीचे उपसभापती नारायण आव्हाळे, सरपंच ललिता आव्हाळे, अनिल सातव, प्रवीण आव्हाळे, रवींद्र कुटे, पंकज आव्हाळे, राहुल सातव यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. आव्हाळवाडी गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच मंदाताई सातव यांनी सांगितले.





