मनोज जरांगेंच्या भेटीसाठी जात असताना बीडचे नवनिर्वाचीत खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारला अपघात

Bajrang Sonawane Accident| बीड लोकसभा मतदार संघातून पंकजा मुंडे यांचा पराभव करत शरद पवार गटाचे उमेदवार सोनवणे यांनी विजय मिळवला. या निकालानंतर बजरंग सोनवणे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी जात होते. त्यादरम्यान बजरंग सोनवणे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. सर्वजण सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे.
जालना जिल्ह्यात धुळे – सोलापूर महामार्गावर रात्री उशिरा हा अपघात झाला आहे. बजरंग सोनवणे यांच्या ताफ्यातील गाडी बजरंग सोनवणे यांच्या गाडीला धडकली. या अपघातामध्ये काहीजण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहे. बजरंग सोनवणे यांच्यासह इतर सर्वजण सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये बजरंग सोनवणे यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामधून ते सुखरूप बचावले आहेत. Bajrang Sonawane Accident|
मनोज जरांगे फॅक्टरचा बजरंग सोनवणेंना फायदा?
दरम्यान, बीडमध्ये मनोज जरांगे फॅक्टर जाणवल्याचे दिसून आले आहे. ऐन निवडणुकांत ओबीसी विरुद्ध मराठा या वादाने बीड लोकसभा मतदारसंघात चांगलाच जोर धरला होता. त्याचा थेट फायदा बजरंग सोनवणे यांना झाल्याचं दिसून येत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे आणि मनोज जरांगे फॅक्टरमुळे मराठवाड्यातील अनेक जागांवर भाजपला पराभव स्वीकारावा लागल्याच्या चर्चा आहेत. भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना ३२ व्या फेरीत तब्बल साडेसहा हजार मताधिक्यांनी पराभवाचा सामना करावा लागला. Bajrang Sonawane Accident|
हेही वाचा :
‘रायबरेली की वायनाड’ राहुल गांधी कोणती जागा सोडणार? ; म्हणाले,”तर मला…”





