Newasa News : नेवासे-श्रीरामपूर मार्गावर पहाटेचा थरार; दुचाकींच्या विचित्र अपघातात दोघांचा करुण अंत
नेवासे - श्रीरामपूर राज्य मार्गावरील अत्यंत धोकादायक (Newasa News) मानल्या जाणाऱ्या 'एस कॉर्नर' वळणावर अचानक काळाने घाला घातला आणि तीन दुचाकी एकमेकांवर अत्यंत वेगाने आदळल्या.

Newasa News : नेवासे – श्रीरामपूर राज्य मार्गावर रविवारी पहाटेच्या शांततेचा क्षणात थरकाप उडाला. मार्गावरील अत्यंत धोकादायक (Newasa News) मानल्या जाणाऱ्या ‘एस कॉर्नर’ वळणावर अचानक काळाने घाला घातला आणि तीन दुचाकी एकमेकांवर अत्यंत वेगाने आदळल्या.
हा अपघात इतका भीषण होता की वाहनांचे तुकडे रस्त्यावर दूरवर विखुरले (Newasa News) गेले आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रवाशांच्या किंकाळ्यांनी परिसर हादरून गेला. या हृदयद्रावक दुर्घटनेत नाशिक येथील स्वाती जाधव आणि श्रीरामपूर येथील गणेश गायकवाड या दोघांचा जागीच दुर्दैवी अंत झाला.
अपघातानंतर (Newasa News) रस्त्यावर रक्ताचा सडा पडला असतानाच रुग्णवाहिका चालक विकास निपुंगे यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी एका क्षणाचाही विलंब न लावता तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांनी गंभीर जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून नेवासे फाटा येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती दोघांना मृत घोषित केले.
या धडकेत विशाल शंकर गुंजाळ (नाशिक), यश समाधान पडघन (नाशिक), ऋषिकेश घोडे (नाशिक), श्रावणी संतोष जाधव (नाशिक) आणि ओम पोपट परदेशी (श्रीरामपूर) हे पाच जण गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर नेवासे फाटा येथील रुग्णालयात अतिदक्षतेखाली उपचार सुरू आहेत.
दोन्ही मृतदेह विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून एकाच वेळी दोन निष्पाप जीवांचा बळी गेल्याने संपूर्ण परिसरात (Newasa News) तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. पहाटेच्या वेळी हा थरार नेमका कसा घडला, वाहनांचा वेग अनियंत्रित होता की अंधार कारणीभूत ठरला, याचा सखोल तपास नेवासा पोलीस करत आहेत.






