Newasa News : नेवासा येथून श्री साईबाबा पायी पालखी दिंडीचे शिर्डीकडे प्रस्थान

नेवासा : नेवासा येथील श्री साईबाबा भक्त मंडळाच्या वतीने आयोजित श्री साईबाबा पायी पालखी दिंडीचे मंगळवारी (दि. २९ जुलै २०२५) शिर्डीकडे प्रस्थान झाले. या दिंडीचे हे पाचवे वर्ष असून, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कर्मभूमीतील माऊली मंदिर प्रांगणात साईबाबांच्या पालखीचे पूजन संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त वेदांताचार्य हभप देविदासजी महाराज म्हस्के यांच्या हस्ते संपन्न झाले.
दिंडीच्या शुभारंभापूर्वी माऊलींच्या पैस खांबाचे दर्शन घेण्यात आले. पुष्पांनी सजवलेल्या साई पालखी आणि त्यातील प्राकृत पादुकांचे हभप देविदासजी महाराज यांनी विधिवत पूजन केले. यावेळी “पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, साईनाथ महाराज की जय” असा जयघोष घुमला. सौ. आरती व्यवहारे-गायकवाड यांनी “भरपूर पाऊस पडू दे, धरणी माता आणि शेतकरी सुखी होऊ दे” अशी प्रार्थना करत दिंडीच्या पाचव्या वर्षाला शुभेच्छा दिल्या.
भक्तांचा उत्साह
या पालखी दिंडीचे नेतृत्व बाळासाहेब बेहळे, उमेश बनकर, आकाश घोडेकर, प्रकाश जाधव आणि हर्षल दारुंटे या युवकांनी केले. दिंडी प्रस्थान सोहळ्यास माजी नगरसेवक दिनेश व्यवहारे, प्रकाश उंडे, समर्थ व्यवहारे, प्रथमेश व्यवहारे, प्रमोद पानसरे, प्रतीक वाघुले, अरुण रासने, संदीप गोरक्षनाथ बेहळे, बाबासाहेब घोडेकर, गोकुळ जाधव, शिवाजी पानसरे, सोनू जगताप, संदीप बेळे, राजू कडू, योगेश मुरकुटे, सोमा बोरुडे, संभाजी व्यवहारे, मच्छिंद्र व्यवहारे, कुमार पानसरे, साई बेळे, दीपक व्यवहारे, संतोष पानसरे, स्वप्निल कडवे, लक्ष्मण घोडके, अण्णा बेळे, प्रसाद व्यवहारे यांच्यासह अनेक साईभक्त आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मार्गदर्शकांचे आभार
दिंडीचे मार्गदर्शक बाळासाहेब बेहळे यांनी उपस्थित साईभक्तांचे आणि सहभागींचे आभार मानले. हा सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. साईबाबांच्या पालखी दिंडीने शिर्डीकडे प्रस्थान करताना भक्तांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.





