Newasa News : धक्कादायक ! अज्ञात वाहनाच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू
आषाढी 'वारी' पायी दिंडी सोहळ्यात विठुरायाच्या भेटीसाठी वारीच्या वाटेवर निघालेल्या हिंगोली (Newasa News) येथील दत्तात्रय गंगाराम जाधव (वय ७०) या वृद्ध भाविकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला.

Newasa News : आषाढी ‘वारी’ पायी दिंडी सोहळ्यात विठुरायाच्या भेटीसाठी वारीच्या वाटेवर निघालेल्या हिंगोली (Newasa News) येथील दत्तात्रय गंगाराम जाधव (वय ७०) या वृद्ध भाविकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेने छत्रपती संभाजीनगर – अहिल्यानगर महामार्गावरील शिंगवे तुकाई फाट्याजवळ शनिवार (दि.११) रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी (Newasa News) पोलीस फौजफाटा दाखल होऊन या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वृद्ध वारकऱ्याचा मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी नेवासे फाटा येथील ग्रामिण रुग्णालयात आणून त्यानंतर या वारकऱ्याचा मृत्यूदेह थेट हिंगोली येथे नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले व आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांच्यावतीने थेट रुग्णवाहीकेतून रवाना करण्यात आला.
याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की,आषाढी वारीमध्ये दिंडीत सहभागी झालेल्या हिंगोली येथील दत्तात्रय गंगाराम जाधव (वय ७०) या वृद्ध वारकऱ्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झालेला होता.
मृत वारकरी भाविकाच्या कुटुंबीयांना मदत म्हणून (Newasa News) आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील आणि नगराध्यक्ष करणसिंह घुले पाटील यांच्या पुढाकारातून हा मृतदेह थेट हिंगोली येथे नेण्यासाठी मोफत रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली.
सदर रुग्णवाहिका चालक रवी निकम यांनी मृतदेह सुरक्षितपणे हिंगोली येथे पोहोचविण्याची जबाबदारी सुरुळीतपणे पार पाडली. या दुर्दैवी घटनेबद्दल सर्वस्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.






