Newasa News : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गेवराई येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

नेवासा : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या नियोजनानुसार नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गेवराई येथे शाळा प्रवेशोत्सव 2025-26 मोठ्या उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील उपस्थित होते.
नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले, तसेच सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके, शूज-सॉक्स आणि शैक्षणिक साहित्य आमदार लंघे पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. शाळेचे उत्साही वातावरण आणि शिक्षकांचा समर्पित दृष्टिकोन पाहून आमदारांनी शिक्षकांचे कौतुक केले.
या सोहळ्यास गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, शमी शेख, राम शिंदे, सरपंच अनिता कर्डिले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ पाटेकर, सोपानराव कर्डिले, दिलीपराव काकडे, निलेश कर्डिले, बापूराव बिडकर, संभाजी राजे जगताप, ज्ञानेश्वर कर्डिले, गोरक्षनाथ भागवत, काकासाहेब गोरे, कैलास काळे, विनायक कर्डिले, रमेश भालेकर, आसाराम कर्डिले, समीर पाटेकर, ज्ञानेश्वर आदमाने, गोरक्षनाथ बर्वे, अमोल बर्वे, शंकरराव खाटीक आणि शंकरराव शिरसाट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्याध्यापक रामेश्वर चोपडे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. रमेश राऊत यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली, तर बापूसाहेब सोनवणे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहशिक्षक जयप्रकाश राशिनकर, शिवराज जाधव, संध्या शिंदे, निशा शेरे आणि प्रदीप सरोदे यांनी मोलाचे योगदान दिले.





